(गणपतीपुळे / वैभव पवार)
आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून आज, बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजता ‘हिमानी भजन मंडळ, मालगुंड’ यांच्या लोकसंगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. भक्ती आणि लोकसंगीताची मेजवानी देणाऱ्या या कार्यक्रमातून मंडळातील कलाकार आपल्या लोकसंगीताचे सादरीकरण करणार आहेत..या कार्यक्रमाचे सादरीकरण विवेक वानखेडे यांनी केले असून, चेतना जोशी यांनी निर्मिती सहाय्य केले आहे.
श्रोत्यांना हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या माध्यम लहरी वाहिनी ११४३ kHz आणि एफ.एम. वाहिनी १०१.५ MHz वर ऐकता येणार आहे. तसेच, ‘News On Air’ या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम थेट (Live) ऐकण्याची सुविधा उपलब्ध असेल. अधिकाधिक श्रोत्यांनी या सुश्राव्य लोकसंगीत कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


