(रत्नागिरी/ वार्ताहर)
शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ शिक्षकांचा ‘टीचर ऑफ द इयर पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. रत्नागिरीतील विविध शाळांमध्ये हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
या पुरस्काराने सौ. जानकी विवेक घाटविलकर, श्री. अजित महादेव मुळीक, श्री. कौस्तुभ विकास पालकर, सौ. शबनूर आबिद होडेकर, सौ. प्रिया अभय नार्वेकर, आसिया अब्दुल्ला बंगाली, सौ. प्राजक्ती राजेंद्र गायकवाड, सौ. अस्मिता हेमंतकुमार चोप्रा, सौ. श्रिया सचिन कांबळे, निगार फझल गुहागरकर, मनाली महेश नाईक, असावरी योगेश पावस्कर, मुश्ताक रसूल आगा, शीतलकुमार कुमार अकुर्डे आणि सौ. म्हस्कर संजीदा रिझवान यांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये पाटवर्धन हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रा. पु. जोग संजीवन गुरुकुल बियाणी बाल मंदिर, मिस्त्री हायस्कूल आणि जिल्हा परिषद शाळा, टीके-कांबळेवाडी क्र. ३ येथील शिक्षकांचा समावेश आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे म्हणाले, “आई-वडील जन्म देतात, पण शिक्षक त्या जन्माला अर्थ देतात. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, संस्कार, माणुसकी आणि योग्य दिशा देतात. हा पुरस्कार शिक्षकांच्या आयुष्यभराच्या कार्याला समाजाने दिलेला मानाचा मुजरा आहे.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थी शिक्षकांनी शिकवलेला एखादा धडा विसरू शकतो; मात्र शिक्षकांनी दिलेला आत्मविश्वास, कौतुक आणि संस्कार तो आयुष्यभर विसरत नाही.”
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती मिळवण्यासाठी गुगल, चॅटजीपीटीसारखी अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मात्र संस्कार, माणुसकी आणि योग्य दिशा कोणतेही तंत्रज्ञान देऊ शकत नाही. हे काम शिक्षक आजही तितक्याच ताकदीने करत आहेत. त्यामुळेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने ‘टीचर ऑफ द इयर’ या उपक्रमाच्या माध्यमातून कर्तृत्ववान शिक्षकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला, असेही अॅड. मनिष नलावडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी ज्येष्ठ रोटेरियन डॉ. अलीमिया परकार व कॅप्टन दिलीप भाटकर, सौ. नमिता कीर, धरमसीभाई चौहान, विजय पवार, रोटे. विनायक हातखंबकर सर, असिस्टंट गव्हर्नर बिपिनचंद्र गांधी, खजिनदार रोटे. धीरज वेल्हाळ, शफीक सय्यद, माजी अध्यक्ष रोटे. श्रीकांत भुर्के, रोटे. तन्वी साळुंखे व रोटे. निहार वैद्य तसेच मोठ्या संख्येने शिक्षकवर्ग, परिवार आणि रोटरी सदस्य उपस्थित होते.


