(देवरुख / प्रतिनिधी)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथील अंतिम वर्ष बी. फार्म आणि डी. फार्मच्या विद्यार्थ्यांनी विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीसह विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे.
विविध नामांकित औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुजित गाडवे, अथर्व मांडवकर, सृष्टी शेलार, ओंकार वाघमारे, साहिल पिंपळे, दिनांती देवस्थळी, क्रांती साळवी, सिद्धी पाटील, अक्षय कोकारे, सानिका झोरे आणि प्रियांका यादव यांचा समावेश आहे.
संस्थेच्या विद्यार्थ्यांवर विश्वास दाखवत त्यांना करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधित कंपन्यांचे प्राचार्यांनी विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने तसेच प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

