(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गुरववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिप्ती पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. रुपेशजी कुर्तडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक श्री. दिलीप गुरव होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. मसरज शेख आणि सहशिक्षक श्री. सावंत यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सत्यश्री खर्डे (अंगणवाडी सेविका), सौ. स्नेहा कुर्तडकर (मदतनीस), श्री. ओंकार शेठ खोत, श्री. शैलेश कुर्तडकर (पोलीस पाटील), सौ. अदिती गुरव, श्री. प्रसाद मेस्त्री, श्री. मनोज खर्डे, श्री. धीरज गुरव, श्री. प्रविण नागवेकर, श्री. अक्षय गुरव, श्रीमती शारदाताई गुरव, श्री. संकेत गुरव, श्री. संदीप पांडुरंग गोठणकर, श्री. अमोल कोंडवे, सौ. सुनिता कुर्तडकर (माजी सरपंच), श्री. दिगंबर गोठणकर, सौ. सृष्टी पेटकर, श्री. शैलेश खर्डे, श्री. नरेंद्र खर्डे आणि श्री. निलेश म्हादये यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी रंगमंचाची व्यवस्था नवलादेवी देवस्थान यांनी उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांची रंगभूषा व वेशभूषा श्री. रविंद्र मेस्त्री यांनी केली, तर ध्वज संकलनाचे काम श्री. स्वप्निल नागवेकर यांनी पार पाडले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. मसरज शेख यांनी सर्व ग्रामस्थ, पालक व उपस्थितांचे आभार मानले. तसेच सहशिक्षक श्री. सावंत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)

