(चिपळूण)
रत्नागिरी शहर बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत चिपळूण येथील मयूर कांबळे बॅडमिंटन अकॅडमीने उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पदकांवर आपले नाव कोरले.
- ९ वर्षांखालील मुलांमध्ये कबीर नाटुसकर याने उपविजेतेपद पटकावले.
- ११ वर्षांखालील मुलांमध्ये लवीन चोचे याने उपविजेतेपद मिळवले.
- १३ वर्षांखालील मुलींमध्ये विश्वा गमरे हिने विजेतेपद पटकावले.
- १३ व १५ वर्षांखालील मुलांमध्ये समर्थ पवार याने विजेतेपद, तर सोहम सुपेकर याने उपविजेतेपद मिळवले.
- १५ वर्षांखालील मुलींमध्ये रिया पेढामकर हिने विजेतेपद पटकावले
- १७ वर्षांखालील मुलींमध्ये तिने उपविजेतेपद पटकावले.
- १९ वर्षांखालील मुलांमध्ये श्वेतांग भांड याने उपविजेतेपद मिळवले.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे तसेच विजेते व उपविजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या यशाबद्दल क्रीडाप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

