(चिपळूण)
चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणेच यंदाही कार्तिक कृष्ण अष्टमी बुधवार दि. १२ नोव्हेंबर आणि कार्तिक कृष्ण नवमी गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी श्री कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिरात करण्यात आले आहे.
श्री कालभैरव जयंती उत्सव कार्यक्रम रूपरेखा पुढीलप्रमाणे बुधवार दि. १२ नोव्हेंबर आणि गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पर्यंत सकाळी सनई चौघडा वादन , श्रींची नित्यनियमित पूजा – अर्चा, रात्रौ ७.३० वाजता कर्पूर आरती नंतर श्री कालभैरव ध्यानं, स्त्रोत्र, अष्टक, कवच पठण इत्यादी धार्मिक विधी होतील
बुधवार दि, १२ नोव्हेंबर रोजी श्री कालभैरव जयंती ( कालाष्टमी ) सकाळी १०.३० ते १ जन्मकाल कीर्तन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री. उदयबुवा फडके ( गोवा ) दुपारी १ ते ५ वाजता श्री गांधारेश्वर भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक श्रींच्या मंदिरापासून ब्राम्हणआऴी, राऊतआळी, शेट्येआळी, श्रीराम चौक, वैश्यवसाहतमधून मुरादपूरकडे साळीवाडी, कुंभारवाडीकडून श्री क्षेत्र गांधारेश्वर भेट घेऊन तळ्यातील श्री गणेश मंदिराकडून बेंदरकरआळी, ब्राह्मणआळीतून श्रींच्या मंदिरात येईल. संध्याकाळी ५ ते ७ वा. कै. वामनराव साडवीलकर संस्थापीत स्वरदर्शन कलाकुंज चिपळूण प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली अंतर्गत पसायदान ( श्री संत ज्ञानेश्वर यांच्या रचना) कार्यक्रम होईल.
गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी लळीत कार्यक्रम दुपारी ११ ते २ ” महाप्रसाद ” वाटप कार्यक्रम, सायंकाळी ६ ते ७.३० वा. श्री वेस मारुती भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक श्रींच्या मंदिरापासून लोटिस्मा वाचन मंदिर मार्गे श्री वेस मारुती भेट घेऊन अनंत आईस फ्याक्टरीकडून श्री गौतमेश्वर नगरातून श्रींच्या मंदिरात येईल. रात्रौ ९ ते १२.३० पर्यंत लळीताचे कीर्तन, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री. उदयबुवा फडके ( गोवा ) आदी कार्यक्रम होईल.
ग्रामदेवतेच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम व उपक्रमामध्ये भक्तजन नागरिकांनी सहभागी होऊन श्रींच्या दर्शनाचा अपूर्व पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण तर्फे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. किशोर शेट्ये, श्री. समीर शेट्ये, महाजन विश्वस्त श्री. पंकज कोळवणकर ( सचिव ), कार्यकारी विश्वस्त श्री. सुमंता शिंदे, श्री. चंद्रशेखर लाड आणि जन्मोत्सव समिती अध्यक्ष श्री. संतोष शांताराम डांगे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये करण्यात येत आहे.

