(चिपळूण)
गुरुवार दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित “रत्नागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्पर्धा – २०२५” मध्ये जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर रत्नागिरी येथे झालेल्या वत्कृत्व आणि कथालेखन स्पर्धेत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री. आनंदराव पवार महाविद्यालयाची इ. ११ वी सायन्स मधील विद्यार्थीनी कु. वेदिका विष्णू हरवडे हिला वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच इ. ११ वी कॉमर्स मधील विद्यार्थीनी कु. वैष्णवी गजानन हळदे हीला सुध्दा कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
कु. वेदिका आणि कु. वैष्णवी या दोघींना प्रा. रुपेश भालेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. तरी या दोघींची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरीता निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. उदयशेठ गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि श्री आनंदराव पवार महाविद्यालयाचे चेअरमन श्री. मल्लेश लकेश्री, कार्याध्यक्षा सौ. सई वरवाटकर, कोषाध्यक्ष श्री. सिद्धेश लाड, कार्यवाह श्री. प्रशांत देवळेकर, पी.आर.ओ. योगेश चोगले, रजिस्ट्रार अजित खेडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भाऊ कांबळे, प्राचार्या सौ. अरुणा सोमण, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

