(संगमेश्वर)
तालुक्यातील माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माखजन विभागाचे उपविभागप्रमुख श्रीधर जोगळे यांनी पक्षाच्या वतीने ही देणगी दिली.
या प्रसंगी विभागप्रमुख अनिल मोरे, श्रीधर जोगळे, बाबू मोरे, विजय कवळकर, नितीन कवळकर तसेच माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप शिंदे आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.
या आधीही माखजन विभागातील शिवसेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरे व मोफत चष्मावाटप उपक्रम राबवण्यात आले होते. आरोग्य केंद्रात ऑक्सिजन निर्मिती करणारे मशीन उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.