( नवी दिल्ली )
‘रेल्वेच्या लोको इन्स्पेक्टर विभागीय पदोन्नती परीक्षा’ (Railway Loco Inspector Divisional Promotion Examination) ही 4 मार्च रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती. या परीक्षेचेची प्रश्नपत्रिका लिक झाल्यामुळे ती रद्द करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आली आहे. ज्यात दोन वरिष्ठ रेल्वे अधिकारी, १७ लोको पायलट आणि इतर रेल्वे कर्मचारी यांचा समावेश आहे. याशिवाय १ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे आणि हस्तलिखित प्रश्नपत्रिकेच्या छायाप्रतीही सापडल्या आहेत.
ही परीक्षा ४ मार्च रोजी होणार होती, पण त्याआधीच सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लखनौ शाखेला पेपरफुटीची माहिती मिळाली आणि त्यानंतर छापे टाकण्याची मालिका सुरू झाली. या पेपरफुटीच्या घटनेनंतर विभागीय परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तथापि, ही विभागीय पदोन्नती परीक्षा पुन्हा कधी होणार याबद्दल परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
भारतीय रेल्वे लोको निरीक्षक विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने रेल्वे ऑपरेशन्स, सुरक्षा नियम, लोकोमोटिव्ह तंत्रज्ञान, ट्रेन हाताळणी प्रक्रिया, अपघात तपास, सामान्य रेल्वे नियम आणि प्रशासकीय पैलूंशी संबंधित विषयांचा समावेश असतो. रेल्वे ऑपरेशन्स आणि लोकोमोटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिनांबद्दल (डिझेल, इलेक्ट्रिक, स्टीम) आणि त्यांचे कार्य, लोको फॉल्ट निदान आणि त्या समस्येचे निराकरण, वेगवेगळ्या भूप्रदेशांमध्ये आणि हवामान परिस्थितीत ट्रेन चालविण्याच्या प्रक्रिया, वीज व्यवस्थापन आणि इंधन कार्यक्षमता, ब्रेक सिस्टम आणि त्यांचे ऑपरेशन याबद्दल प्रश्न विचारले जातात.
लोको इन्स्पेक्टर होण्यासाठी, प्रथम लोको पायलट म्हणून काम करणे आवश्यक आहे. या पदावर किमान ५ वर्षे काम केल्यानंतर, लोको पायलट विभागीय परीक्षा देऊन उमेदवार लोको इन्स्पेक्टर बनू शकतात.