(उल्हासनगर)
उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी परिसरात एका बांग्लादेशी पोर्नस्टारला अटक करण्यात आली. बनावट कागदपत्राच्या आधारे पासपोर्ट तयार करुन स्वतःची खरी ओळख लपवून ती येथे वास्तव करत होती. तिचे खरे नाव बन्ना शेख असताना ती आपले खरे नाव आणि माहिती लपवून रिया बर्डे या नावाने राहत होती.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे राहणाऱ्या अरविंद बर्डे याने आपल्याला बनावट कागदपत्रे तयार करुन दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या गुन्ह्याचा अधिक तपास हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप करीत आहेत.