(संगमेश्वर / वार्ताहर)
तालुक्यातील ओझरेखुर्द येथे मंदार अनिल केदारी (वय २१) या तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे ओझरेखुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओझरेखुर्द येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मंदार केदारी याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील कारणाबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
या घटनेची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.


