( नवी दिल्ली )
मध्यपूर्वेतील विविध देशांत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित दूतावासांचे व वाणिज्य दूतावासांचे संपर्क तपशील जाहीर केले आहेत. कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांनी आवश्यकतेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे भारतीय दूतावासाकडून 800 247 1234 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच cw.riyadh@mea.gov.in या ईमेलद्वारेही संपर्क साधता येणार आहे. इस्रायलमधील तेल अवीव येथे +972-54-7520711 आणि +972-54-2428378 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. cons1.telaviv@mea.gov.in या ईमेलवरही मदत मिळू शकते.
इराणची राजधानी तेहरान येथे +989128109115, +989128109109, +989128109102 आणि +989932179359 हे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. संयुक्त अरब अमिरातमधील अबू धाबी येथे 800-46342 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून +971543090571 या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही संपर्क साधता येईल. pbsk.dubai@mea.gov.in आणि ca.abudhabi@mea.gov.in या ईमेल आयडीवरूनही सहाय्य मिळेल. कुवैत सिटी येथे +96565501946 या क्रमांकावर तसेच community.kuwait@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधता येईल.
बाहरीनची राजधानी मनामा येथे 00973-39418071 हा संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ओमानची राजधानी मस्कत येथे 80071234 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून +96898282270 या व्हॉट्सअॅप क्रमांकावरही मदत मिळू शकते. cw.muscat@mea.gov.in व cons.muscat@mea.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याची सोय आहे. जॉर्डनची राजधानी अम्मान येथे 00962-770 422 276 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
इराकची राजधानी बगदाद येथे +964 771 651 1185 व +964 770444 4899 हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. eoibaghdad.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध असून cons.baghdad@mea.gov.in, cons1.baghdad@mea.gov.in आणि pol.baghdad@mea.gov.in या ईमेल आयडीवरूनही सहाय्य मिळू शकते.
परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपत्कालीन परिस्थितीत अफवांवर विश्वास न ठेवता थेट अधिकृत संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा. भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांच्या सुरक्षेसाठी व हितसंरक्षणासाठी सज्ज असून आवश्यक ती मदत तत्काळ पुरविण्यात येईल,

