तसेच उंटाचा प्रकार सर्वात उंच असणाऱ्या प्राण्यांमध्ये केला जातो. एक उंट 450 किलोग्राम वजन उचलू शकतो. पूर्वी मनुष्य उंटाचा वापर आपल्या प्रवासासाठी, ओझे वाहून नेण्यासाठी करत होते. त्यांच्या चामड्यापासून चामड्याच्या वस्तू बनवल्या जातात आणि केसाचा वापर कापड बनवण्यासाठी केला जातो. तसेच उंटाला वाळवंटी जहाज असे म्हणतात. उंटांना आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणत पाणी साठवण्याची क्षमता असते आणि यामुळे दोन आठवड्यापर्यंत उंट विनापाणी राहू शकतो. जर उंट गरज पडली तर सात महिन्यापर्यंत विनापाणी राहू शकतात. उंटांना पळण्याची क्षमता 40 ते 50 किलोमीटर प्रति तास आहे.
उंट 3 मिनिटात 100 ते 200 लिटर पाणी पिऊ शकतात. एवढे लिटर पाणी इतक्या स्पीडने कोणताही प्राणी पिऊ शकत नाही. वाळवंटी प्रदेशात पाणी मिळणे खुप अवघड गोष्ट आहे, म्हणून देवाने या प्राण्याची रचना अशा पद्दतीने केली आहे. जेणेकरून त्यांचे जीवन सुलभ होईल. पण उंटाना अनेक वेळा भयंकर आजार होतो, ज्यामुळे त्याच्या शरीरात विष तयार होते आणि वेळेत उपचार न केल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
या आजारापासून वाचवण्यासाठी उंटाला तेथील लोक विषारी साप खायला देतात. या भागातील उंट पाळणाऱ्यांचे म्हणणे आहे की काही वेळा उंटांना एक विशेष आजार होतो आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी उंटांना विषारी जीवंत साप खायला दिले जातो. सामान्यतः या आजारामध्ये उंट पाणी पिणं आणि अन्न खाणं बंद करतो. त्याचबरोबर या आजारामुळे उंटाचे शरीरही कमकुवत होण्यास सुरुवात होते. हा भयानक आजार बरा करण्यासाठी उंटांना विषारी साप दिला जातो. परंतु उंट हे साप खात नाही, त्यांना हे जबरदस्तीने खाऊ घातले जाते. पण उंट सुरुवातीला सापाच्या विषामुळे आजारी पडतो आणि अन्नपाणी सोडून देतो, पण जेव्हा ते विष उतरत, तेव्हा मात्र उंट भरपूर पाणी आणि जेवण करतो. उंट त्यावेळी भरपूर आणि सारख पाणी पितो, यामुळे तो आजार पूर्णपणे नष्ट होऊन उंट बरा होतो .
त्यांची पाचनक्रिया चांगली असते. वाळवंटात सापडणाऱ्या सगळ्या वनस्पती, काटेरी वनस्पती सगळं उंट खातो आणि त्याला पचवतोही. उंटाचे दोन प्रकार असतात एक कूबड असलेले उंट आणि दुसरा कुबड नसलेले उंट. वेगवेगळ्या प्रदेशनुसार उंटाच्या जाती, रंग आणि रूप बदलत असतात. काही भागात उंट त्याच्या दुधासाठी पाळतात आणि काही ठिकाणी मांस विकण्यासाठी पाळतात.
तसेच उंटाचे मांस हे अतिशय स्वादिष्ट असल्याचे सांगितले जाते, आणि हे मांस खाल्ल्याने बरेच आजार दूर होतात असे म्हटले जाते. रेग्युलर दुधापेक्षा उंटाचा दुधामध्ये 10 पट कॅल्शिअम असते, त्यामुळे उंटाच्या दूध हे महाग असते. तसेच उंटांचे अश्रू खूप महागडे असतात. उंटाला जेव्हा विषारी साप खायला दिले जाते, तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येते आणि या अश्रूंचा वापर सापाचे अँटिडोस तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हे अश्रू खुप महाग असतात. तसेच उंटाच्या पाठीवर राक्षस बसलेला असतो असे अरबच्या लोकांचं मानणे आहे. ते म्हणतात कि कधीही उंटावर बसाल तेव्हा देवाच नाव घ्या. तसेच कधी उंटाला ताप आला तर त्याच्या शरीरावर कट मारून विष बाहेर काढतात, यामुळे त्वरित त्याची तब्येत बरी होते.