बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण जग विश्वास ठेवते. दरवर्षी प्रमाणे, बाबा वनगा यांनी 2024 साठी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. जगात असे काही लोक होते आणि काही अजूनही आहेत ज्यांचे अंदाज अनेक वेळा खरे ठरले आहेत. बाबा वेंगा यांच्या आता या जगात नसले तरी त्याचे अंदाज अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे अंदाज आतापर्यंत 85 टक्क्यांपर्यंत खरे ठरले आहेत. आपल्या भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वांगाच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्यांनी २०२४ या वर्षासाठी केलेले धक्कादायक दावेही समोर आले आहेत.
मृत्यूपूर्वी, बाबा वेंगा यांनी जगाचा अंत, युद्ध आणि आपत्ती यासह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यानी सन ५०७९ पर्यंत भाकित केले होते. सोव्हिएत युनियनचे विघटन आणि अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेने 9/11 च्या हल्ल्यांसह बाबा वेंगाचे अनेक भाकीत खरे ठरले. बाबा वेंगा यांची ‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ अशी ओळख आहे. 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची वयाच्या बाराव्या वर्षी एका रहस्यमय वादळात दृष्टी गेली. यानंतर त्यांनी जगातील विविध देश, सामाजिक-आर्थिक आणि जागतिक घडामोडीबाबत अनेक भाकितं केली, जी नंतर खरी ठरली.
मिररच्या रिपोर्टनुसार, बाबा वेंगा यांनी 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आणि स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. बल्गेरियातील बाबा वेंगा यांचे खरे नाव वेंगेलिया पांडेवा गुश्टेरोवा आहे. 1996 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 1980 मध्ये, बाबा वेंगा यांनी रशियाच्या कुर्स्क शहरात एका भयानक घटनेची भविष्यवाणी केल्याचा दावा केला. पाण्याखाली एखादी घटना घडेल आणि संपूर्ण जग त्यावर आक्रोश करेल असा दावा त्यांनी केला होता. ऑगस्ट 2000 मध्येही त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचे सांगितले जाते. आण्विक पाणबुडी बुडाल्याने एकूण 188 क्रू मेंबर्स मारले गेले. याशिवाय 1989 मध्ये त्यांनी 9/11 च्या हल्ल्याबाबतही भाकीत केले होते आणि म्हटले होते की, अमेरिकेवरही हल्ला होईल.
Also Read : वास्तुशात्रानुसार आपले घर असल्याची खात्री करा!
बाबा वेंगा यांनी 2024 साठी काही आश्चर्यकारकपणे भीतीदायक भविष्यवाणी केली आहे.बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार, 2024 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या होऊ शकते. या कटात अन्य कोणी नसून त्यांच्याच देशातील लोकांचा सहभाग असू शकतो. याशिवाय 2024 मध्ये युरोपमध्ये दहशतवादी हल्ला करतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. बाबा वेंगा यांचा दावा आहे की, ‘मोठा देश’ पुढील वर्षी जैविक शस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल. याशिवाय बाबांनी असा दावाही केला आहे की, पुढील वर्षी मोठे आर्थिक संकट येणार असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे. बाबा वेंगा यांनी 2024 मध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा इशाराही दिला आहे. 2024 मध्ये संपूर्ण जगाला हवामानाशी संबंधित गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल, असा दावा त्यांनी केला.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2024 मध्ये कर्करोगासह अनेक असाध्य आजारांवर उपचार मिळू शकतात. पुतिन यांनी नुकतेच सांगितले की, रशियन शास्त्रज्ञ कर्करोगाची लस तयार करण्याच्या जवळ आले आहेत. बाबा वेंगांच्या म्हणण्यानुसार, कॅन्सर आणि अल्झायमरसारख्या धोकादायक आजारांवर 2024 साली परिणामकारक उपचार मिळू शकतात. आतापर्यंत या आजारांवर उपचार करणं अशक्य होतं आणि दरवर्षी केवळ देशातच नव्हे, तर जगभरात लाखो-करोडो लोक या आजारांना बळी पडतात. परंतु आता बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरल्यास जगभरात मोठा फायदा होईल.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1