(रंजक / अदभुत)
पत्त्यांमधील 4 राजांपैकी बदाम राजाला मिशा नसतात, फक्त तीन राजानांच मिश्या असतात. याचं नेमकं कारण काय आहे याबाबत अनेकांना माहित नसते. आपल्यापैकी बरेच जण आवडीने किंवा टाईमपास म्हणूनही पत्ते हा खेळ खेळत असतात. 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये चौकट, किल्वर, इस्पिक, बदाम ही चार चिन्ह आणि त्याच रंगाचे चार राजा असतात.
याबाबत असे सांगितले जाते की, जेव्हा पत्त्यांचा खेळ अस्तित्वात आला तेव्हा बदामच्या राजाला मिशी होती. पण जेव्हा या पानांची पुनर्रचना करण्यात आली, तेव्हा डिझायनर बदामच्या राजाची मिशी काढायला विसरला. आश्चर्य म्हणजे चूक कळल्यानंतरही त्याने ती सुधारली नाही आणि मग या चारपैकी एक राजा मिशीशिवायच राहिला. ही चूक न सुधारण्याचे एक कारण असेही मानले जाते की, ‘बदाम राजा’ हे ‘शार्लेमेन’ या फ्रेंच राजा चे चित्र आहे. तो दिसायला सुंदर आणि प्रसिद्ध होता. त्यामुळे वेगळे दिसण्याच्या इच्छेने त्याने मिशा काढल्या. या राजावर एक हॉलिवूड चित्रपटही बनवण्यात आला आहे, त्यातही राजाला मिशी नव्हती.
पत्ते आणि राजांचे कनेक्शन पत्त्यांमधले 4 राजे इतिहासामधील काही महान राजांचे प्रतिनिधीत्व करतात. पहिला हुकुमाचा बादशहा हा प्राचीन काळातील इस्रायलचा राजा डेव्हिडचे, किल्वर या कार्डावर मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट आहे. तिसरा चौकट हा रोमन राजा सीझर ऑगस्टसचे तर चौथा बदाम हा फ्रान्सचा राजा शारलेमेन आहे, जो रोमन साम्राज्याचा पहिला राजा होता.
याविषयी सांगितली जाणारी दुसरी कथा मात्र अधिक रोचक आहे. या कथेनुसार बदाम राजा हा किंग शारलेमेनवरून चितारला गेला. हा राजा दिलदारपणासाठी आणि त्याच्या देखणेपणासाठी प्रसिध्द होता. इतरांहून आपण वेगळे दिसायाला हवे या विचारातून या राजाने स्वत:च्या मिशा काढून टाकल्या होत्या. त्याकाळात बिनमिशीचा पुरुष अपवादाने असे. उलट दाढी मिशांचं जंगल असणारे पुरुषी चेहरेच सर्वत्र दिसत. किंग शारलेमेननं मिशा काढून चेहरा स्वच्छ केला आणि त्याच्या देखणेपणात भर पडली. म्हणूनच या देखण्या आणि लोकप्रिय राजाच्या आठवणीत बदाम राजा बनविला गेला आणि म्हणूनच बदाम राजाला मिशा नसतात, असे मानले जाते.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1