आयएएस परिक्षेला असे काही प्रश्न विचारले जातात की, त्याची उत्तरं बुद्धीमत्तानाही जड जातात. IAS ऑफिसर बनायचं असेल तर फार मोठ्या कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. IAS बनण्यासाठी यूपीएससी नावाची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा भारतातील सगळ्यात अवघड परीक्षा मानली जाते. एमपीएससी, यूपीएससी परीक्षांसाठी स्पर्धक खूप मेहनत घेत असतात. सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांचा खूप अभ्यास केल्यानंतरही एखादा अगदीच सोपा वाटणार प्रश्न स्पर्धकांना अडचणीत टाकू शकतो. असे अनेक प्रश्न असतात ज्यांची उत्तर पुस्तकात मिळत नाहीत. पण प्रसंगावधन राखून, लक्ष विचलीत न होता दिलेले योग्य उत्तर देशसेवेची संधी देऊ शकतं.
आयएएस परिक्षांसंदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सोशल मीडियात खूप व्हायरल होत असतात. यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असते, असेच काही प्रश्न आयएएस परिक्षेला विचारले जाऊ शकतात. यातील काही प्रश्न जाणून घेऊ.
प्रश्न १) पुरुषांमध्ये वाढणारी गोष्ट कोणती आहे परंतु महिलांमध्ये नाही?
उत्तर : दाढी / मिश्या
प्रश्न २) ५०० आणि २००० च्या नोटांच्या छपाईसाठी किती किंमत आहे?
उत्तर : रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार २०० रुपयांची नोट छापण्याची किंमत २.९३ आहे. ५०० ची नोट छापण्याची किंमत २.९४ आणि २००० ची नोट छापण्याची किंमत ३.५४ रुपये आहे.
प्रश्न ३) अशी कोणती वस्तू जो परिधान करणारा खरेदी करु शकत नाही ? आणि स्वत:साठी खरेदी करु शकत नाही ?
उत्तर : कफन
प्रश्न ४) 404 Error म्हणजे काय? यामध्ये 404 असे का लिहीले जाते ?
उत्तर : वेब पेज न उघडले गेल्यास सर्व सर्च इंजिनमध्ये एरर दाखवण्यासाठी ४०४ नंबरला मान्यता देण्यात आली आहे.
प्रश्न ५) जर निळा समुद्रामध्ये लाल रंगाचा दगड टाकल्यास काय होईल?
उत्तर : तो दगड ओला होईल.
प्रश्न ६) विमानात प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्यास त्याचे नागरिकत्व काय असेल?
उत्तर : भारताच्या नागरिकत्व नियमानुसार जर मुलाचे पालक भारतीय असतील तर मूल भारताबाहेर जन्माला आले तरी मूलसुद्धा भारतीय झाले.
प्रश्न ७) कोणाचा जन्म दरवर्षी होत नाही?
उत्तर : 29 फेब्रुवारी रोजी जन्मलेली व्यक्ती
प्रश्न ८) व्हिटॅमिनचा शोध कोणाला लागला?
उत्तर : Casimir Funk यांनी फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वांचा शोध लावला
प्रश्न ९) कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे आहे?
उत्तर: हिप्पो
प्रश्न १०) कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते कोणाचे असेल ?
उत्तर : कोंबडी
प्रश्न ११) अशी कोणती वस्तू आहे ती सतत पडत असते पण कधीच तुटत नाही?
उत्तर : पाऊस
प्रश्न १२) अशी कोणती वस्तू आहे जी आत मध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो?
उत्तर : खायचे पान. पानाला तोंडामध्ये टाकल्यानंतर लाल रंग बाहेर येतो.
प्रश्न १३) राम आणि शाम दोघे जुळे भाऊ आहेत, दोघांचा जन्म मे मध्ये झाला आहे पण त्यांचा वाढदिवस जून मध्ये असतो असे का?
उत्तर : मे हे दोघांचे जन्म झालेले ठिकाण आहे.
प्रश्न १४) तुला एखाद्या सकाळी कळले की तू गरोदर आहेस तर तू काय करशील?
उत्तर : मुलगी – मी खूप खुश होईन आणि ही गोष्ट माझ्या पतिला सांगेन.
प्रश्न १५) एखादा मनुष्य आठ दिवस न झोपता कसा जिवंत राहू शकतो?
उत्तर : तो मनुष्य रात्री झोपत असेल.