(आरोग्य)
मीठ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. यामधून आपल्याला सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयोडीन हे जीवनसत्त्व मिळतात. जर जेवणात मीठ कमी असेल तर जेवण फारसं चविष्ट लागत नाही. काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. पण कधी कधी नकळतपणे जेवणात मीठ कमी पडतं. आणि मग सगळ्यांना ताटात थोडं थोडं मीठ वाढायला लागतं. स्वयंपाक कितीही चांगला केलो, पण जर त्यात मिठाचे प्रमाण योग्य नसले तर त्या जेवणाची चव बिघडते. तिखट- आंबट गोड या सगळ्या गोष्टी जशा जेवणात महत्त्वपूर्ण असतात तसेच जेवणात मीठ असणेही फार आवश्यक आहे. मात्र जेवण अळणी झाले म्हणून त्यात वरून मीठ टाकणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवताना पदार्थांत वरून मीठ टाकल्यास शरीराचे संतुलन बिघडू शकतं. मीठ योग्य प्रमाणात सेवन केलं तरच ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. अन्यथा जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागु शकतो.
अनेकदा कांदा काकडी, मुळा, खाताना आपण त्यावर मीठ घालून खातो. अश्या पध्दतीचं खाणं चवीला जरी चांगलं लागत असलं तरी वरून मीठ घेण्याची सवय महागात पडू शकते. आणि त्यांमुळे वेगवेगळे आजार होतात. मिठाच्या अतिरिक्त सेवनाने ह्दयाचे, किडनीचे किंवा नसांचे आजार होतात. उन्हाच्या दिवसात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर तहान लागते. अशा स्थितीत उन्हात फिरणाऱ्यांच्या शरीरातील मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते. शरीरासाठी मीठ जरी आवश्यक असलं तरी त्याचं प्रमाण हे पाच ग्रामपेक्षा जास्त असू नये. जर हे प्रमाण वाढलं तर त्याचा परीणाम रक्तदाबावर होऊ शकतो.
वृद्धांना त्यांच्या जेवणात मीठाचं प्रमाण कमी लागतं. त्यामुळे अनेकदा जेवणात कमीच मीठ घातलं जातं. आणि त्यानंतर बाकीचे चवीनुसार मीठ जेवणात वरून वाढून घेतात. पण जेवणात असे वरून मीठ घेणे फार नुकसानकारक आहे. ही सवय मोडण्यासाठी जेवणातलं मीठाचं प्रमाण कमी करा. काही लोकांना सलाडवर वरून मीठ घालून खायची सवय असते. तसेच ताक, कोशिंबिर यावरदेखिल वरून मीठ घातलं जातं. हे अत्यंत धोक्याचं आहे. असं केल्याने त्या पदार्थाचे सत्त्व निघून जाते. जेवणात वरून मीठ घेण्याची सवय सुटत नसेल. तर मीठाऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापर करु शकता. असे केल्यास तुमची मीठ घ्यायची सवय बंद होईल. तसेच सुक्या मसाल्यांचाही वापर करु शकता.
Also Read वास्तुशात्रानुसार आपले घर असल्याची खात्री करा!
जेवणात वरून मीठ घातल्यास अनेक आजार होण्याचा धोका असतो. जेवणातील मीठात असलेलं आर्यन शरीरात सहज पचवता येतं. पण कच्च्या मीठाचं सेवन शरीरावर प्रेशर पाडतं. ज्यामुळे हायपरटेंशनची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रिपोर्ट्सनुसार जास्त मीठ खाल्ल्याने हृदयाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही मीठ खाणे कमी केले तर आपले हृदय चांगले राहण्यास मदत होते. मीठाचं अधिक सेवन केल्याने तहान कमी आणि भूक जास्त लागते. त्यामुळे जेवताना वरून खाल्ल्यास आजारांना निमंत्रण मिळते. असे प्रसंग टाळण्यासाठी जेवताना वरून मीठ घेणे कटाक्षाने टाळा.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1