ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. भव्यता आणि सुंदरतेमुळे ताजमहालची ओळख जगभरात आहे. ताजमहालला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. असे म्हटले जाते की, ताजमहाल हा मुघल बादशाह शाहजहान याने आपली पत्नी मुमताज महलची आठवण म्हणून बनवले होते. दरवर्षी ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून जवळपास ७० लाखांहून अधिक पर्यटकांची गर्दी होते. तसेच ताजमहालला ‘प्रेमाची निशाणी’ म्हणून ही ओळखलं जातं.
ताजमहाल बाबत आणखी एक गोष्ट महत्वपूर्ण आहे, ती म्हणजे ताजमहाल वरून कोणतंच विमान जात नाही. हे खरं असून ताजमहाल च्या ७.४ किलोमीटरच्या क्षेत्रात कोणत्याही विमानाला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. ताजमहाल वरून कोणतंच विमान जात नाही कारण हे एक ‘नो फ्लाय झोन’ आहे. २००६ मधे भारत सरकारने ताजमहाल साठी नो फ्लाईंग झोन हा कायदा लागू केला. या कायद्यानूसार ताजमहाल च्या ७.४ किलोमीटर च्या क्षेत्रात कोणतेही विमान उडण्यास बंदी घातली आहे.
‘नो फ्लाय झोन’ एक असं क्षेत्र असते जेथे विमानाला उडण्यास बंदी घातलेली असते. नो ठरलाय झोनलाच Air Exclusion Zone (एअर एक्सक्लूजन झोन )असंही म्हटलं जातं. अनेक क्षेत्र असे असतात जे की भौगोलिकदृष्ट्या विमानाला उडण्यास सुरक्षित नसतात अशा क्षेत्राला नो फ्राईंग झोन मानले जाते. या शिवाय सरकार काही लोकांच्या सूरक्षेसाठी एखाद्या क्षेत्राला नो फ्लाईंग झोन म्हणून जाहीर करते. यामुळे कोणतेच विमान ताजमहाल च्या वरून जात नाही.
जगातील आणखी अशी ठिकाणं जेथे विमान उड्डाणावर बंदी आहे
डिस्ने पार्क, कॅलिफोर्निया: जगभरातील लोकांमध्ये डिस्ने पार्क खूप प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मॅजीकल किंवा जादुई आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील या डिस्ने पार्कवरून विमानाच्या उड्डाणावर बंदी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9/11 हल्ल्यानंतर डिस्ने पार्कची देखील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
तिबेट: तिबेट हा जगातील सर्वात उंच प्रदेशांपैकी एक मानला जातो, या प्रदेशाची सरासरी उंची 16000 फूट आहे. या सुंदर जागेच्या हद्दीत उंच पर्वत असल्यामुळे या ठिकाणी विमान उड्डाण करण्यास मनाई आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे ठिकाण नो फ्लाय झोन म्हणून घोषीत केले गेले आहे.
माचू पिचू : जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेला पेरूचा माचू पिचू हा देखील नो-फ्लाय झोन आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. हे ऐतिहासिक ठिकाण दक्षिण अमेरिकन देश पेरू येथे आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2,430 मीटर उंचीवर उरुबांबा व्हॅलीच्या वरच्या टेकडीवर वसलेले आहे. हे ठिकाण त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे, तसेच दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पती जीवनाची संख्या देखील येथेच आहे.
मक्का: इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे मक्का. मक्का आणि विशेषत: पवित्र काबावरून कोणत्याही प्रवासी विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही. हे हज यात्रेचे अंतिम गंतव्यस्थान आणि इस्लामिक विश्वासाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
बकिंगहॅम पॅलेस: युनायटेड किंगडमचा बकिंगहॅम पॅलेस देखील नो फ्लाय झोन क्षेत्र आहे. हे ब्रिटीश शाही घराचे कार्यालय आणि प्रतीक आहे. ब्रिटनची राणी किंवा राजा येथे राहतो. राजवाडा आणि राजघराण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. जरी आता ब्रिटनमधील इतर अनेक ठिकाणे देखील या झोनमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये 10 डाऊनिंग स्ट्रीट, संसदेची सभागृहे आणि यूकेच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान यांचा समावेश आहे.
बार्सिलोनाचे गावा क्षेत्रः बार्सिलोनाच्या गावा येथे स्थित एक क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टीने नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे. अहवालानुसार, येथील वनस्पती आणि प्राणी फारच दुर्मिळ आहेत. हे लक्षात घेऊन तेथील हवा प्रदूषित होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. या भागात स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे घरही आहे.
Post Views: 3,382