आपले शरीर सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला झोप अत्यंत गरजेची असते. रात्रीची कमीत कमी आठ तासांची झोप ही शरीरासाठी आपल्याला अत्यंत गरजेची आहे. झोप जर पूर्ण झाली नाही तर आपल्याला अनेक शारीरिक समस्या उध्दभवण्याची शक्यता असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि ताणतणावामुळे आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होतात. अनेकांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्यामागे अनुवांशिकता हे कारण असतं. त्यामुळे अशा परिस्थितीत हे डाग पूर्णपणे घालवणं अवघड होतं. अनुवांशिकता हे कारण असल्यास ही काळी वर्तुळं थोडी पुसट करता येतात पण पूर्णपणे घालवता येत नाही.
आजच्या बदललेल्या जीवनशैलीच्या परिणामामुळे आपल्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर विशेषतः डार्क सर्कल तयार होतात आणि दिसूनही येतात. डोळ्यांची देखील योग्य काळजी न घेतल्यास डार्क सर्कल होतात. डार्क सर्कल कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती उपचार देखील करू शकता ज्यामुळे तुमची डार्क सर्कलची समस्या दूर होऊ शकते.
डार्क सर्कल कमी करण्यासाठी बदामाचे तेल आणि मध अत्यंत फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाविरोधात लढण्याचे गुणधर्म असतात जे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. बदामाचे तेल त्वचेला हायड्रेट ठेवण्याबरोबरच नमीयुक्त देखील ठेवते. दररोज रात्री झोपताना बदामाचे तेल आणि मध मिक्स करून तयार केलेली पेस्ट डोळयांना लावल्याने आणि नंतर थंड पाण्याने धुतल्याने आपल्याला नक्कीच फरक जाणू शकतो.
डार्क सर्कल कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ई चे तेल देखील फायदेशीर ठरते. रोज रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई चे तेल कोरफड जेलमध्ये मिसळून डोळ्यांभोवती लावल्यास डार्क सर्कल कमी होण्यास मदत मिळते. झोपताना नेहमी सरळ रेषेत झोपावे. पोटावर किंवा एका कुशीवर झोपल्यामुळे शरीरात लिंफॅक्टीक ऍसिड जमा होते आणि आपण चेहरा देखील फुगतो.
डोळे निरोगी राहण्यासाठी आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे जाण्यासाठी आपण आय क्रीमचा देखील वापर करायला पाहिजे. आय क्रीम लावून डोळ्यांना नियमितपणे मॉईशराइझ केले पाहिजे. आयक्रीम फक्त आपल्या डोळ्यांसाठीच नाही तर आपल्या त्वचेच्या काळजीसाठी देखील फायदेशीर असते. डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेला जेवढे आपण मॉईशराइझ करता येईल तेवढे केलेच पाहिजे जेणेकरून आपल्या डोळ्यांजवळील भाग अधिक चांगला होईल आणि डार्क सर्कल होण्याचे प्रमाण देखील वाढणार नाही.
लॅपटॉपचा वापर
लॅपटॉप टीव्ही, मोबाइल जास्त बघणं ही सवय डार्क सर्कलसाठी कारणीभूत ठरते. स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्यानं डोळ्यांवर ताण येतो. त्याचा परिणाम म्हणूनही डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. त्यामुळे जर तुम्ही सतत स्क्रीनसमोर असाल तर त्याचा वेळ कमी करा.
झोप पूर्ण न होणं
झोप पूर्ण न होणं, थकवा यामुळे डार्क सर्कल येतात. साधारणत: 7-8 तासांची झोप आवश्यक असते. पण काम, डिजीटल साधनं हाताळण्यात जाणारा वेळ यामुळे झोपेकडे दुर्लक्ष होतं. तुमची झोप पूर्ण करा यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून देखील दुर राहाल.
मेकअप अती केल्यामुळे
अनेक कॉस्मेटिक्स असे असतात ज्यामुळे त्वचेला ॲलर्जी होते आणि नंतर त्यामुळे डार्क सर्कल्स पडतात. तसेच डोळ्यांना केलेला मेकअप चुकीच्या पध्दतीनं पुसणं हे डार्क सर्कल होण्यास कारणीभूत ठरतं.
सनस्क्रीन लोशन
सनस्क्रीनमुळे लोशनचा त्वचेच सूर्याच्या अती नील किरणांपासून संरक्षण होतं. हेच सनस्कीन डोळ्यांखालील नाजूक त्वचेचं संरक्षण करण्यासाठीही महत्वाचं असतं. पण सनस्क्रीन वापरण्यास टाळाटाळ केल्यास डोळ्याखालील त्वचेचं संरक्षण होत नाही आणि काळी वर्तुळं पडतात.
गरम पाण्याने चेहरा धुणे
गरम पाण्यानं चेहेरा धुण्याची सवय त्वचेसाठी घातक असते. गरम पाण्यानं चेहेरा धुताना तेवढ्यापुरती छान वाटतं. पण त्यामुळे त्वचा खराब होते. त्वचेचा पोत बिघडतो. त्यामुळे चेहरा थंडपाण्याने धुवा.
मिठाचं प्रमाण
आहारात मिठाचं प्रमाण जास्त असल्यास शरीरातील पेशी पाणी धरुन ठेवतात. यामुळे डोळ्याखालील त्वचा अधिकच पातळ होते आणि काळी पडते.
धूम्रपानाची सवय असल्यास कोलॅजन निर्मितीस अडथळा येतो, त्यामुळे त्वचा काळी पडते, खराब होते. त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेखालील रक्तप्रवाह बिघडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात.
आजारपण
आजारपणामुळेही डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडतात. आजारपणात नीट जेवण जात नाही. त्यामुळे शरीरास पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्याचा परिणाम शरीर अशक्त होतं. चेहेरा काळवंडतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होतात.
एलोवेरा
- एलोवेरा लावल्याने पिगमेंटेशन कमी होऊन कोलेजन वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे ‘विटामिन ई’ची कमतरता भरून निघते, त्यामुळे डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवण्यासाठी एलोवेरा फायदेशीर मानले जाते.
- थंड दूधही पिगमेंटेशन कमी करून कोलेजन वाढण्यासाठी कायदेशीर मानले जाते. यासाठी कापसाचा बोळा थंड दुधात बुडवून तो चेहऱ्यावर लावावा.