(अदभुत / रंजक)
भारतातील आपल्या पूर्वजांनी स्थापिलेली अनेक ठिकाणची मंदिरे रहस्यमयी वाटतात. भारतात भरपूर मंदिरे आहेत, त्यांचा रेखीव आकार आपल्याला आकर्षित करतो. ही मंदिरे आपल्या नक्षीदार रूपातून परिसराचेही सौंदर्य खुलवत असतात, म्हणूनच हजारो-लाखो लोक हे सौंदर्य पाहण्यास उत्सुक असतात. भारतातील अनेक सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर असे आहे कि , ज्याच्या रहस्याच्या चर्चा अनेक लोक करत आहेत. या मंदिराची रचना इतकी सुंदर आहे की कोणीही आकर्षित होऊ शकतो. याचा रेखीवपणा मनाला शांती देतो. याची उभारणी खूपच सुंदर असून आकर्षक वाटते. हे मंदिर नेपाळच्या काठमांडुपासून १० किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या मंदिरात भगवान विष्णू यांची सुंदर मूर्ती आहे. हे भगवान विष्णूचे मंदीर नेपाळ येथील शिवपुरी मध्ये स्थित आहे. हे मंदिर त्या परिसराची खूप शोभा वाढवते, म्हणून तर येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. येथे भगवान विष्णू यांची अतिशय सुंदर मूर्ती आहे. या मंदिराचे गूढ रहस्य, अद्भूत आणि अचंबित करणारे आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान विष्णू यांची झोपलेली मूर्ती स्थापन केली आहे, जी भक्तांना खूपच आकर्षक वाटते. हे मंदिर बुधनिलकंठ मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. या मंदिरात भगवान विष्णू यांची ही झोपलेली मूर्ती सुमारे ५ मीटर लांब आहे व तलावाची लांबी एकूण १३ मीटर आहे. मंदिरामुळेहा तलाव खूपच प्रसिद्ध आहे, हा तलाव वैश्विक समुद्राचे प्रतिनिधित्व करत असल्याची माहिती दिली जाते. मंदिरात जी भगवान विष्णू यांची मूर्ती आहे ती खूप रेखीव आहे. या मूर्तीची सुंदरता डोळ्यांना क्षणात भावते म्हणून अनेक लोक या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून येतात.
भगवान विष्णूची ही अनोखी मूर्ती बनवली आहे, या मूर्तीचे रेखाटन खूपच रेखीव वाटते. ही तलावातील विष्णूची मूर्ती शेषनागाच्या कुंडात विराजमान झालेली आपणास पाहायला मिळते, तसेच या मूर्तीमध्ये भगवान विष्णूचे पाय ओलांडले गेले आहेत. तसेच या प्रतिमेत भगवान विष्णू यांचे चार हात आहेत, जे वेगवेगळे दैवी गुण दाखवतात. यांमध्ये एका हातात मनाचे प्रतिनिधित्व करणारे पहिले चक्र, तसेच चार घटकांचे प्रतिनिधित्व करणारे शंख शेल, चालणारे विश्व दर्शवणारे कमळाचे फुल, तसेच प्रबळ ज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारी गदा दिसून येते. या चार गोष्टी पाहून मन प्रसन्न होऊन जाते, विष्णुवरची श्रद्धा वाढत राहते.
तसेच या मूर्तीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ही भगवान विष्णूची मूर्ती शेषनागाच्या कुंडात स्थित असलेली आपण पाहतो. पण आश्चर्य म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूची मूर्ती असून पाण्यात पाहिले असता भगवान शंकर दिसून येतात. शिवशंकरांची अशी अप्रत्यक्षपणे मूर्ती पाहिल्यावर कोणीही थक्क होऊन जाते. येथील भाविकांचे म्हणणे आहे की, शिवमहोत्सवाच्या वेळेस तलावाच्या पाण्याखाली प्रत्यक्ष भगवान शिव आपल्याला दर्शन देतात. तसेच येथील भाविक या मंदिराला खूप मानतात. गोसाईकुंडात असलेल्या या बुढानीलकण्ठ मंदिराचा वार्षिकोत्सव ऑगस्ट महिन्यात साजरा होतो. या शिव उत्सवावेळी तलावात महादेव शिवशंकराची प्रतिमा दिसते, असा दावा या भागातील स्थानिक आणि भाविकांकडून केला जातो. या उत्सवाला केवळ नेपाळ, भारतातून नाही, तर जगभरातील भाविक, पर्यटक या मंदिरात हजेरी लावतात.
येथील एका राजपरिवाला एक शाप असल्याचे सांगितले जाते. या राजपरिवारातील कोणत्याही सदस्याने बुढानीलकण्ठ मंदिरातील स्थापन असलेल्या श्रीविष्णूंच्या मूर्तीचे दर्शन घेतले, तर त्याचा मृत्यू होतो, असा शाप असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या राजपरिवारातील कोणताही सदस्य या मंदिरात जात नाही. मात्र, या मंदिरातील मूर्तीची एक हुबेहूब प्रतिकृती निर्माण करून एका मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. प्रति बुढानीलकण्ठ मंदिरात राजपरिवार दर्शन घेण्यासाठी जातो.
आपण पौराणिक कथा पाहिली तर कळते की जेव्हा समुद्रमंथन सुरू होते आणि विष समुद्रातून बाहेर येण्याची वेळ आली तेव्हा सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान शंकर यांनी सर्व विष स्वतः घेतले होते. त्यांनी ते विष ग्रहण केल्यामुळे त्यांना नीलकंठ म्हटले जाते. सर्व विष ग्रहण केल्यावर जेव्हा भगवान शिव यांचा घसा जळत होता, जेव्हा त्यांना त्रास होऊ लागला होता. तेव्हा त्यांनी काठमांडूच्या उत्तर सीमेवर जाऊन डोंगरावर त्रिशूल मारले जेणेकरून तिथे एक तलाव तयार होईल. तिथे त्यांनी तलावाची स्थापना केली आणि आपली तहान देखील भागवली होती. हे तलाव ‘गोसाईकुंड’ म्हणून देखील ओळखले जाते, या तलावाची अनेक वैशिष्ट्य आहेत.
हे तलाव मंदिराची शोभा वाढवते, या मंदिरामुळे अनेक कथा आपल्याला माहिती होतात. नेपाळ मधील काठमांडू येथील शिवपुरी मध्ये हे मंदिर स्थित असून अनेक भाविक नेहमी दर्शनासाठी येतात.