(नवी दिल्ली)
झोप ही प्रत्येकाला प्रिय असते, मानवाच्या आयुष्यातील ती एक महत्त्वाची गरज आहे. सात तास झोप झाल्याशिवाय आपल्याला दिवसभर काम करण्यास उत्साह येत नाही. झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर त्याचे अनेक वाईट परिणाम होतात. मात्र आश्चर्य वाटेल पण जगात एक असादेखील व्यक्ती आहे जो 61 वर्ष झोपलाच नाही. हा व्यक्ती व्हिएतनामध्ये (Vietnam) राहतो. त्याचं नाव थाय एनजोक असं असून ते 80 वर्षाचे आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की 61 वर्षांपासून झोपलेले नाहीत असा दावा केला आहे. त्याच्या या कारणामुळे त्यांना Sleepless Man म्हणून देखील ओळखलं जातं.
झोप ने येण्याची अनेक कारणं असतात. या व्यक्तीचं कारणदेखील काही वेगळं आहे. लहानपणी त्यांना अचानक एका रात्री ताप आला होता. त्यानंतर त्यांना आजतागायत झोपच येत नाही. या गोष्टीला आता 61 वर्षे झाली. 1962 पासून ते झोपूच शकले नाही आहेत. ते जागेच दिवस रात्र जागेच असतात.
त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनीही त्यांना कधी झोपलेलं पाहिलं नाही आहे. कदाचित एनजोक हे जगातील पहिलेच व्यक्ती असतील, ज्यांना झोप येत नाही. त्यांच्या झोप न येण्याचं कारण डाॅक्टरांनी निद्रानाश हा आजार असल्याचं सांगितलं आहे. निद्रानाशामुळं शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होतात, मात्र एनजोक यांच्यावर या गोष्टीचा काहीच विपरित परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
ऐनजोक अगदी तंदुरुस्त आहेत. ते सकाळी फिरायला देखील जातात. त्यांना कोणताही आजार नाही. मात्र थाय एनजोक यांनी दिवसभर आपण थकत असून मला देखील सामान्य लोकांप्रमाणे शांतपणे झोपावे अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.