(वास्तू)
वास्तुशास्त्रानुसार १00 % घर असणे ही एक कल्पना आहे. हे सर्वाना कधीच शक्य होत नाही. मात्र वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते, ज्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचं असतं. वास्तुमध्ये काही ना काही दोष वा त्रुटी तर राहणारच. मात्र अनेकवेळा वास्तूदोष घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. या कमतरतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. आता घर पाडल्यानंतर पुन्हा बांधता येत नसल्याने या दोषांपासून मुक्ती कशी मिळवायची हा प्रश्न सतावत असतो. हे दोष कमीत कमी राहवेत म्हणून वास्तुशास्त्रानुसार पुढीलप्रमाणे रचना करावी, ज्यामुळे आपल्या घरात सुख–शांती व समृद्धी येते.
- प्रवेशद्वार :
वास्तु प्रवेशाच्या जागी भरपूर प्रकाश असावा, लाल रंगाचा वापर टाळावा. मुख्य दरवाजा वर संध्याकाळी प्रकाश असावा म्हणून दिवा [बल्ब] लावावा. - मुख्य दरवाजासमोर आरसा ठेऊ नये त्यामुळे घरातील उर्जा बाहेर जाते.
- जागा असेल तर छोटी झुडुपे/वेलींनी दरवाजा सुशोभित करावा.
- ९० अंशात कुठल्याही अडथळ्याविना उघडणारा दरवाजा असावा.
- दरवाजावर नावाची पाटी लावावी, दरवाजा उत्तरेला व पश्चिमेला असेल तर धातूची पाटी वापरावी. दक्षिण व पूर्वाभिमुख दरवाजासाठी लाकडाची नावाची पाटी वापरावी.
- मुख्य दरवाजाला संगमरवर किव्वा लाकडाचा उंबरठा असावा. उंबरठा हा नकारात्मक उर्जेला थोपवून फक्त सकारात्मक ऊर्जाघरात येऊ देतो असे मानतात. ओम, स्वस्तिक, अशा दैवी प्रतिकांनी दरवाजा सजवावा, त्यासमोर रांगोळी काढावी. हे शुभ लक्षणअसते व त्यामुळे चांगले भाग्य येते.
- घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला ठेवल्याने धनप्राप्ती होते.
- घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला ठेवल्याने घरात शांतता राहते.
- घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असेल तर सौभाग्य वाढते.
- घराचा मुख्य दरवाजा नेहमी आतल्या बाजूने उघडा. बाहेरून उघडणारा दरवाजा शुभ मानला जात नाही. जर तुमच्या घराचा दरवाजा बाहेरून उघडला तर तुमच्या घरात अनावश्यक खर्च वाढतो, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते.
- घराचा मुख्य दरवाजा बनवताना लक्षात ठेवा की दरवाजाच्या खालच्या भागामध्ये जमिनीचा थोडासा फरक असावा, जेणेकरून दरवाजा उघडताना घासणार नाही. घासून दार उघडून पैसे मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.
- मुख्य दरवाजा आणि इतर कोणताही दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज येऊ नये. वारंवार होणार्या आवाजामुळे नकारात्मकता वाढते, त्यामुळे मनात अस्वस्थतेची भावना निर्माण होते. त्यामुळे दारांच्या सांध्यांमध्ये तेल ठेवा. इतर कोणत्याही कारणास्तव दारातून आवाज येत असल्यास, ते त्वरित दुरुस्त करा.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किंवा जवळ घाण किंवा रद्दी ठेवू नये. मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. डस्टबिन कधीही दारासमोर किंवा कोपऱ्यावर ठेवू नका. यामुळे तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
- घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणतीही सावली नसावी तसेच मुख्य दरवाजासमोर कोणताही अडथळा नसावा. यामुळे तुमच्या घरात पैशांचा ओघ थांबतो. तुमच्या दारावर एखाद्या गोष्टीची सावली पडल्यास दोन्ही बाजूला हळद, कुंकू, रोळी आणि कुमकुम मिसळून दारावर स्वस्तिक चिन्ह बनवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखेल.
स्वयंपाकघर :
- अग्नि देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपला गॅस, शेगडी पूर्व दिशेने ठेवा.
- स्वयंपाकघर आग्नेय कोनात नसेल तर घरात राहणाऱ्या लोकांच्या, विशेषतः महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अन्न आणि पैशाचेही नुकसान होते. यामुळे पचनाचे अनेक आजार होऊ शकतात.
- ज्या घरात किचन आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोनात नसेल तर वास्तुदोष दूर करण्यासाठी शेंदुरी गणपती बाप्पाचे चित्र स्वयंपाकघराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावे.
- तुमचे स्वयंपाकघर अग्नी कोनात न ठेवता दुसऱ्या दिशेला बांधले असेल तर यज्ञ करताना तेथे ऋषीमुनींची आकृती ठेवा.
- आग्नेय कोनात असलेल्या स्वयंपाकघरात, प्लॅटफॉर्म पूर्व आणि दक्षिणेने वेढलेला असावा. वॉश बेसिन उत्तरेकडे असावे. जेवण बनवताना तोंड पूर्वेकडे असले पाहिजे, उत्तर आणि दक्षिणेकडे अजिबात नाही.
- वास्तूनुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला स्वयंपाकघर बनवू नये. या दिशेला स्वयंपाकघर असणे हा घराचा प्रमुख वास्तुदोष आहे. घरातील स्त्री आजारी राहील आणि अनावश्यक खर्च वाढेल.
- जर स्वयंपाकघर अग्नीत नसेल तर ते पूर्वेकडे चालेल, नाहीतर पश्चिमेला आणि उत्तरेलाही चालेल. बाकी दिशांमधून वास्तुदोष निर्माण होतात.
- स्वयंपाकगृह आणि बाथरूम एकाच भिंतीला लागून नसावे याची दक्षता घ्या.
- रात्री जेवण झाल्यानंतर उष्टे भांडे सिंकमध्ये नाही ठेवायला पाहिजे, याने घरात रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो.
- लक्षात ठेवा की डस्टबिन घराच्या मुख्य दारासमोर ठेवू नये, असे केल्याने देखील घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.
- महिन्यातून एकवेळा घरात जरूर खीर बनवा आणि लक्ष्मीला त्याचा प्रसाद म्हणून द्या व नंतर घरातील लोकांबरोबर मिळून त्याचे सेवन करा, याने घरात दरिद्रता येत नाही.
- घरात तयार केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक प्रकारचे थोडेसे अन्न सर्वप्रथम एका थाळीत वेगळे काढून हात जोडून वास्तुुदेवाला अर्पित केले पाहिजे. त्यानंतर घरच्यांनी जेवण केले पाहिजे. असे केल्याने वास्तुुदेवता त्या घरावर नेहमी प्रसन्न राहते. वेगळे ठेवलेले अन्न नंतर गायीला द्यावे.
- गृहिणी स्वयंपाक करताना तीचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला हवे.
- घरात तूटफूट झालेली यंत्रे , जुने तुटके सामान, चपला, फुटलेली काचेची भांडी ठेवू नयेत. ती घराच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे.जर ती घरात ठेवली तर घऱच्यांना मानसिक अशांतता किंवा आजारपणाला तोंड द्यावे लागते.
- घरातली केरसुणी (झाडू) कधीही उभी ठेवू नये. जेथे पाय लागतील किंवा ओलांडावे लागेल, अशा ठिकाणीही केरसुणी ठेवू नका. तशी ठेवल्यास घरात पैसा टिकत नाही.
- घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे. घरातल्या ईशान्य भागात कोणताही पाळीव पशू ठेवू नका. कुत्रे, कोंबडे व म्हैस यांच्याबाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. अन्यथा घरात अशांती पसरते.
- दारात किंवा बाल्कनीत तुळशीचे रोपटे लावून त्याची दररोज पूजा करावी.
- स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये. प्रत्येक घरात तुळस, सीताफळ, अशोक, आवळा, या पैकी कोणतीही झाडे अवश्य लावावीत.या झाडांमुळे घरात सुख शांती नांदते.
Also Read :रत्नागिरीकरांसाठी “स्विफ्ट प्लेअर्स नृत्य अकॅडमी” तर्फे उन्हाळी नृत्य शिबिर
देवघर :
- वास्तूनुसार ईशान्य दिशा देवासाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिशेला पूजास्थानाची स्थापना करा. जर तुमचे पूजेचे घर इतर दिशेला असेल तर वास्तुदोष टाळण्यासाठी पाणी पिताना तोंड ईशान्य दिशेला ठेवावे. देवघर हे ईशान्येच्या कोपर्यात असायला हवे किंवा शक्यतो पूर्व–पश्चिमेला असायला हवे.
- घरात नेमाने देवाचे पूजन करावे. पूजा करणार्या व्यक्तीचे तोंड सदैव पूर्व किंवा उत्तरेकडे असावे.
- घरात दररोज तूपाचा दिवा लावावा.
- देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये.
- घरातल्या देवालयात तीन गणपती ठेवू नका. जर असेल तर त्यातील एकाला विसर्जित करून द्या किंवा दुसर्या ठिकाणी ठेवून द्या.तीन गणपती असतील तर त्या घरात कायमची अशांती राहते.
- त्या प्रकारे तीन देवींना किंवा दोन शंखांनासुद्धा एकत्र पूजाघरात ठेवणे वर्जित आहे.
- घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे.
- घरात प्रसाधन गृहाजवळ देवघर नसावे.
- पूजेच्या खोलीत अंधार असू नये. तुमच्या घरात पूजेची खोली हे देवाचे घर आहे आणि तेथे कधीही अंधार असू नये.
- सुख– शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढर्या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावले पाहिजे.
- सर्व मंगल कामना हेतू शेंदुरी रंगाच्या गणपतीची आराधना योग्य ठरेल.
- आपल्या कुलदेवतेची मुर्ती अथवा तसबीर ठेवून दररोज त्याची आराधना केल्यास इच्छित फल मिळते.
- देव्हारा थेट जमिनीवर ठेवू नका. त्याऐवजी तो थोड्या उंच चौथा–यावर किंवा चौरंगावर ठेवावा. देव्हारा संगमरवरी किंवालाकडी असावा,
- अक्रिलिक किंवा काचेचा देव्हारा टाळावा.
- देव्हा–यात मूर्तींची गर्दी करू नये – एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवू नयेत. देव्हारा–यात ठेवलेले फोटो अथवा मूर्ती चिरागेलेल्या किंवा इतर नुकसान झालेल्या नसाव्यात कारण ते अमंगल समजले जाते. काही विशेष पूजांच्या वेळी कुटुंबातील सर्वसदस्यांनी एकत्र जमून प्रार्थना करावी.
- देव्हा–यात सतत सकारात्मक ऊर्जा खेळती राहावी यासाठी ती जागा स्वच्छ आणि मोकळी ठेवावी. तिथे धूळ, कोळिष्टके जमू देऊ नये तसेच उपकरणांची गर्दीही करू नये. मुख्य म्हणजे देव्हारा आणि परिसर ही मनाला शांती देणारी जागा असते याचीजाणीव ठेवावी.
घरामध्ये सुख –समृद्धी मिळावी यासाठी सकाळ–संध्याकाळ धुप, अगरबत्ती, निरंजन लावणे महत्वाचे आहे . - घरामध्ये सुख –समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे , भांडणे टाळावीत .
- पूजेच्या वेळी घंटानाद करा. घराच्या प्रत्येक कोपर्यात घंटानाद करणं गरजेचं आहे. अडगळीच्या ठिकाणी अधिक वेळ घंटानाद करा. घंटा वाजवताना “आगमनार्थ तू देवानाम् गमनार्थ तू राक्षसम्, कुर्वे घण्टारव तत्र देवता आल्हादकारम्” हा मंत्र मोठ्या आवाजात म्हणा.
- घंटानाद आणि शंखनाद यांचा त्रास अशुभ उर्जेला होतो. शंखनाद हा मंगलध्वनी आहे. जमल्यास दररोज शंखनादही करावा.
- ईशान्य दिशेमध्ये बाथरूम किंवा स्टोरेज ची खोली नसावी त्यामुळे आरोग्यहानी,धनहानी आणि सर्व प्रकारे नुकसान होते.
- ईशान्येच्या दोष निवारणासाठी सुंदर आकर्षक कारंजे ठेवावे किंवा पांढऱ्या संगमरवरी बाऊल मध्ये पाणी भरून ठेवावे यामुळेईशान्य दिशेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
- वास्तूनुसार पूजेचे घर बांधले असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. घरातील पूजेची खोली किंवा पूजाघर ईशान्य दिशेला असावी. मूर्ती किंवा फोटो समोरासमोर नसून एकाच दिशेने असाव्यात.
- पूजेच्या खोलीत घुमट, ध्वजा, कलश, त्रिशूल किंवा शिवलिंग इत्यादी ठेवू नयेत.
- बेडरुममध्ये कधीही पूजेची खोली नसावी. पण जर बेडरूममध्ये पूजाघर बांधण्याची सक्ती असेल तर ती पडद्याने झाकली पाहिजे. पूजेसाठी पांढरा, हलका पिवळा किंवा हलका गुलाबी रंग शुभ आहे.
- पूजा कक्षाच्या वर किंवा खाली शौचालय किंवा स्वयंपाकघर असू नये.
- पूजेची खोली कधीही पायऱ्यांखाली बांधू नये.
- मंदिर नेहमी तळमजल्यावर असावे.
- पूजा कक्ष मोकळा आणि मोठा असावा.
शयनकक्ष :
- वास्तुशास्त्रानुसार घराचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर लिव्हिंग रूम ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोनात असावे.
- जर घर पश्चिमेकडे तोंड करून असेल तर हॉल उत्तर-पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य कोनात असावा.
- घराचे तोंड दक्षिणेकडे असल्यास हॉल आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोनात असावा.
- बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये.
- धार्मिक आस्थेने जुळलेली कोणतीही वस्तू शयनकक्षात नसावी.
- बेडरूममध्ये बेड हा शक्यतो लाकडी सागवानी असावा लोखंडी असेल तर त्याला लाकडी अथवा रबरी गट्टु बसवुन घ्यावेत त्यामुळेशारीरिक व्याघींचे प्रमाण कमी होते.
- बेडच्या खाली नऊ मोर पिस ठेवावीत त्यामुळे शांत झोप लागते आणि आजुबाजूच्या वातावरणातील वाईट प्रभाव कमी होऊनआरोग्य सुधारते.
- मास्टर बेडरूमच्या गादीखाली बँकांचे पासबुक, कोर्टाच्या नोटीसा, फाईल आणि कोणतेही नकारात्मक कागदपत्रे ठेवु नये.
- घरात तुटलेली भांडी ठेवू नये. काचेच्या तुटलेल्या वस्तू अजिबात ठेवू नयेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.
घरामध्ये हे सहा फोटो नकोतच :
महाभारताच्या युद्धाचे चित्र, ताजमहल, नटराजाची मूर्ती, बुडणारे जहाज, फवारा, जंगली जनावरांचे फोटो आदी चित्र घरात ठेवून नयेत. असे मानले जाते की, जशी घरात चित्र असतात तसेच वातावरण घरात तयार होत असते. अशी चित्रे तुमच्या घरातील लोकांमध्ये हिंसा किंवा निराशेची भावना निर्माण करतात. म्हणून घरातील भिंतींवर मनाला प्रफूल्लीत करणारी चित्रे लावावीत.
वास्तु नियमानुसार घरातील प्रत्येक खोलीत देवाची चित्रे लावू नयेत. घराचा फक्त ईशान्य कोपरा देवांच्या फोटोसाठी योग्य मानला जातो. तसेच नटराज आणि माता लक्ष्मी यांचे उभे चित्र किंवा मूर्ती चुकूनही घरात ठेवू नये. बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये परिवाराचा फोटो लावतो पण या फोटोत तीन लोकांचा सहभाग नसावा याची पूर्ण काळजी घ्या. वास्तूशास्त्रानुसार भिंतीवर कुटुंबातील तीन सदस्यांचे फोटो अशुभ मानले जातात.
वास्तुशास्त्रानुसार रडणार्या मुलाचा फोटो घरात कधीही ठेवू नये. असे म्हणतात की असे चित्र कामाच्या ठिकाणी कोठेही ठेवले जाऊ नये. असे मानले जाते की मुले नेहमी नशिबाचे प्रतीक असतात, परंतु रडणार्या मुलांचे चित्र दुर्दैवाला आमंत्रित करते. घरामध्ये डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्याचे चित्र घरात लावू नये. अशा चित्रातून निर्माण होणाऱ्या वास्तुदोषामुळे पैसा खर्च होतो, अशी मान्यता आहे. गुलाबाचं फुल सुंदर असतं पण तरी देखील त्याच्या रोपाचं छायाचित्र घरात लावू नये. गुलाबाला काटे असतात आणि वास्तुशास्त्रा नुसार काटे असलेली कोणतिही वस्तू घरात ठेऊ नये किंवा लावू नये, यामुळे नकारात्मकतेचा प्रसार होतो. मावळत्या सूर्याचे किंवा महाभारताच्या युद्धाचे चित्र घरात कधीही ठेवू नका, अशा चित्रांमुळे निराशा आणि वाद निर्माण होतात.
ही चित्रे घरात नक्की ठेवा
वास्तूशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे चित्र उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे यामुळे घरामध्ये धन-धान्य वाढवण्यासाठी मदत होते. घराच्या उत्तर दिशेला आपल्या कुटुंबाचा फोटो लावल्याने नात्यात प्रेम वाढते. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी बेडरूममध्ये राधा-कृष्णाचे चित्र अवश्य लावावे. खूप प्रयत्न करूनही जर आपल्या आयुष्यात आर्थिक संकट येत असेल तर घरात देवी लक्ष्मी आणि कुबेराचा फोटो घराच्या उत्तर दिशेला लावा. वास्तुशास्त्रात धनप्राप्तीसाठी उत्तर दिशा चांगली मानली जाते. ही चित्रे असली तर आर्थिक उन्नती होते.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेच्या भिंतींवर फक्त निसर्गाशी संबंधित वस्तूंचीच चित्रे लावावीत. घरात लहान मुलांचे हसण्याचे चित्र असणे खूप चांगले असते. घरात नेहमी हसतमुख मुलाचे चित्र लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मुलाचे चित्र पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ असते. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला नद्या आणि धबधब्यांचे चित्र लावल्याने सकारात्मक उर्जाही वाढते. जर तुम्ही घरात पूजेचे घर बांधले असेल तर लक्षात ठेवा की नैऋत्य दिशेला बांधलेली खोली पूजेसाठी वापरू नये.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1