साखरपा गावचे सुपुञ जिल्हा काॅंग्रेसचे नेते मुंबईचे माजी उपमहापौर,नगरसेवक अविनाश लाड यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी व कोविडसेंटरसाठी उपयुक्त अशी साधनसामुग्री दिली. लांजा,राजापुर,साखरपासह देवरुख कोविड सेंटरला त्यांनी ही मदत दिली.
देवरुख कोविड सेंटर साठी तात्काळ ऑक्सिजन पुरवणारी ऑक्सिजन काॅन्सेट्रेटर हे मशिन उपलब्ध करुन दिले.या मशिनसाठी कुणबी पतपेढी देवरुखचेही योगदान लाभले आहे.
देवरुख कोविड सेंटरसाठी यावेळी मास्क,हॅंडग्लोज,पीपीई किट,बिस्किटपुडे,सॅनिटायझर आदी स्वरुपात मदत केली.
साखरपा विभागातील कोरोनाबाधित रुग्णांना ने आण करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर २४ तास सेवा देणारी व ऑक्सिजनची सोय असणारी रुग्णवाहिका अविनाश लाड यांनी दिली आहे. या रुग्णवाहिकेसाठी संतोष गोताड, राजा रेवाळे,अमोल लाड,विशाल बाईंग हे समन्वयक असणार आहेत.
देवरुख कोविड सेंटर येथे ही मदत नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी स्विकारली. यावेळी काॅंग्रेस उपाध्यक्ष अशोकराव जाधव,माजी जि.प.सदस्य दिलीप बोथले, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष प्रभाकर सुपेकर, कोंडगाव सरपंच संदेश उर्फ बापु शेट्ये,तळवडे सरपंच प्रवीण टक्के,सरपंच रावणंग,बंटी गोताड,सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, पिंट्या जाधव आदि उपस्थित होते.यावेळी काॅंग्रेस पक्षातर्फे कोविड रुग्णबाधितांना वेळोवेळी मदत दिली गेली आहे असे सांगत अविनाश लाड हे तळागाळातील लोकांसाठी काम करणारे काॅंग्रेसचे सच्चे नेते आहेत असे मत अशोक जाधव यांनी व्यक्त केले.गोसावी यांनी शासनातर्फे लाड यांचे आभार मानले.