जगातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विविध देशांनी त्यांच्या शिकारीवर बंदी घातली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेले हे मस्त्यप्राणी इतके महाग आहेत की आपण किंमतीची कल्पनाही करू शकत नाही. अशाच जगातील सर्वात महाग असलेल्या माशाबद्दल जाणून घेऊया…
या माशाच्या संवर्धनासाठी दरवर्षी २ मे रोजी जागतिक टूना दिवस साजरा केला जातो. या माशाला वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर २०१६ पासून अधिकृतपणे जागतिक टूना दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यूके सरकारने अटलांटिक ब्लूफिन टुनाच्या मासेमारीसाठी बंदी घातली आहे. याशिवाय हा मासा पकडल्यास तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो. चुकून कोणी पकडले तर त्याला लगेच समुद्रात सोडावे लागते. ब्लूफिन टूना त्याच्या वेगासाठी आणि समुद्रात खोलवर जाण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. या माशाचे वय सुमारे 40 वर्षे असते.
या माशाशी संबंधित अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. या माशाचा आकार ट्यूना प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे आणि तो खूप वेगाने पोहतो. नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेला हा मासा पाणबुडीतून निघणाऱ्या टॉर्पेडो शस्त्रासारखा आहे. या आकारामुळे तो समुद्रात लांब पल्ल्यासाठी अति वेगाने पोहू शकतो. या माशामुळं मानवाला कोणतीही हानी होत नाही.
तज्ञांच्या मते, या माशाची लांबी 3 मीटर पर्यंत असू शकते आणि वजन सुमारे 250 किलो असते. हा मासा मानवांना कोणतेही नुकसान करत नाही. तो इतर लहान मासे खातो, कारण लहान मासे हेच त्याचे अन्न आहे. अटलांटिक ब्लूफिन टूना माशांना उबदार रक्त असते. पोहण्याच्या स्नायूंमध्ये जमा झालेल्या उष्णतेमुळे ते खूप वेगाने पोहतात. या एका माशाची किंमत 23 कोटी पर्यंत असू शकते असे सांगितले जाते.