चेहऱ्याला कोरफड कशी लावायची व फायदे
कोरफड जादुई वनस्पती आहे आणि याच्या गुणधर्मांविषयी अधिक माहिती देण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आजकाल प्रत्येकाच्या घरात कोरफड आढळते आणि प्रत्येकाला याचे आयुर्वेदिक उपयोग माहिती आहेत. परंतु तरीही आपण चेहऱ्यावर कोरफड लावण्याचे फायदे काय आहेत याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया व सोबतच योग्य लाभ प्राप्त करण्यासाठी चेहऱ्याला कोरफड कशी लावायची याची माहिती जाणून घेऊ.
चेहऱ्याला करते मॉइश्चराईज
एलोवेरा अर्थात कोरफड हे एक आयुर्वेदिक मॉइश्चरायझर आहे. कोरड्या त्वचेला कोरफड च्या उपयोगाने मॉइश्चराईज करता येते. चेहऱ्याचे त्वचा मॉइश्चराईज काढण्यासाठी कोरफडचा वापर पुढीलप्रमाणे करावा-
- सर्वात आधी कोरफड चे एक पान घ्यावे व त्याचे जेल एका वाटीत काढून घ्यावे.
- आता ह्या जेल मध्ये काही थेंब खोबऱ्याचे तेल टाकावे.
- दररोज रात्री झोपण्याच्या आधी चेहऱ्यावर हे जेल लावावे. तुम्ही रात्रभर हे जेल लावलेले ठेवू शकतात.
पिंपलच्या (मुरूम) समस्येवर कोरफडचा उपयोग
चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या मुरुमांचा प्रत्येकाला त्रास होतो. परंतु कोरफड चा उपयोग करून काही दिवसातच मुरुमांची समस्या नाहीशी करता येते. जर तुम्ही देखील पिंपलच्या व त्यांच्यामुळे चेहऱ्यावर पडणाऱ्या काळ्या डागांच्या समस्येने त्रस्त असाल तर पुढील उपाय करावा.
- सर्वात आधी एका वाटी मध्ये कोरफडचा रस घ्यावा. या रसात 1 चमचा लिंबू रस, एक चमचा मध, एक चमचा हळद आणि काही थेंब गुलाब जल टाकावे.
- आता हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यावे.
- यानंतर ह्याला संपूर्ण चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावावे.
- 15-20 मिनिटे पॅक सुकू द्यावा.
- यानंतर तुम्ही कोमट पाण्याने चेहरा धुऊ शकतात.
वय लपवण्यासाठी / सुरकुत्या कमी करण्यासाठी कोरफड आहे रामबाण
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे वय इतरांना कळायला नको व तो नेहमी तरुण दिसावा. परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. ह्या सुरकुत्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. परंतु कोरफड जेल च्या नियमित उपयोगाने आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवू शकतात. यासाठी पुढील पद्धतीने कोरफडचा वापर करावा.
- सर्वात आधी कोरफड चे एक पान घ्यावे व त्याचे जेल एका वाटीत काढून घ्यावे.
- आता ह्या जेल मध्ये जैतून चे तेल टाकावे व चेहऱ्यावर मास्क प्रमाणे लावावे.
- कमीत कमी 30 मिनिटे चेहर्यावर लावून ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.
- असे केल्याने तुम्ही नेहमी टवटवीत दिसाल तसेच यामुळे वय कमी दिसण्यास मदत होईल
कोरफड आणि काकडी
काकडी व कोरफड एकत्र करून चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास लावा. कोरफड जेल आणि काकडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीने काकडी – कोरफडचा रस बाउलमध्ये गाळून घ्या. हा रस तुम्ही कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. याद्वारे तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन ईचा पुरवठा होईल आणि त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळेल. हवे असल्यास तुम्ही व्हिटॅमिन ई तेलासह देखील कोरफड जेल मिक्स करू शकता. नियमित हे उपाय केल्यास चेहऱ्यावर सकारात्मक बदल पाहायला मिळतील व चेहरा सुंदर व फ्रेश दिसेल
सर्वात चांगले एलोवेरा जेल कोणते आहे ?
बाजारात अनेक प्रकारचे एलोवेरा जेल विक्रीला उपलब्ध असतात. परंतु आपणास यांच्यापासून पाहिजे तेवढा फायदा मिळणार नाही. चांगले परिणाम मिळवण्याकरिता नेहमी कोरफड च्या रोपट्या च्या पानाचाच रस वापरावा. यासाठी तुम्ही आपल्या घराच्या बाहेर कुंडी मध्ये एक कोरफड लावू शकता. कोरफड चे रोप आपणास कोणत्याही लहान मोठ्या रोपट्याचा दुकानात मिळू शकेल. याशिवाय ज्यांना तत्काळ कोरफड हवे असेल व रोप घेऊन त्याला मोठे करावे एवढा वेळ नसेल. तर तुम्ही पुढील मार्केटमधील प्रख्यात कंपनीचे एलोवेरा ब्युटी जेल खरेदी करू शकता.
कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो. तर कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात.
मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे चुरचुरत असतील, तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो. तर अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते. जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो.
कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.