(अदभुत / रंजक)
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून मानवी देह तयार झाला आहे असं भारतीय दर्शनांमध्ये सांगितलं आहे. पृथ्वी म्हणजे भौतिकता. पृथ्वीमुळे शरीराला जडत्व येतं. मानवी शरीर डोळ्यांना दिसतं, कानांनी त्याचा आवाज ऐकू येतो, शरीराला विशिष्ट गंध असतो, त्याला स्पर्शही करता येतो. शरीराचं हे इंद्रियाधारीत ज्ञान पृथ्वी या महाभूताकडून मिळालेल्या जडत्वामुळे शक्य होतं. ज्या धातू आणि अधातूंच्या कणांनी पृथ्वी तत्त्व निर्माण होतं त्याच कणांनी माणसाचं भौतिक शरीर बनलेलं असतं.
आपल्या या मानवी शरीराची रचना जितकी जटील आहे, तितकीच ती मजेदारदेखील आहे. तसं पाहिलं तर आपले शरीर हे खूपच गुंतागुंतीच्या बाबींनी युक्त आहे. आपल्या शरीराशी संबंधित अनेक मजेदार गोष्टी आपल्याला माहित नसतात. संशोधक आजही आपल्या शरीराच्या विविध भागांचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येतात. तर शरीराच्या अनेक बाबींबद्दल आपण अद्यापही अनभिज्ञच आहोत. शरीराच्या अशाच काही रोचक,रंजक गोष्टींबाबत जाणून घेऊ.
- एक सर्वसाधारण मनुष्य आपल्या हाताच्या कोपराला स्वतःची जीभ स्पर्श करू शकत नाही.
- मानवी दात हे खडकासारखे मजबूत असतात.
- जे लोक रात्री जास्त काम करतात, शक्यतो त्यांचे वजन हे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं असते.
- बहुतेक लोकांना झोप येण्यासाठी सरासरी 7 मिनिटे लागतात.
- एका सर्वसाधारण मनुष्याच्या एकूण हाडांपैकी 25 % हाडे हि पायात असतात.
- एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात सरासरी 60,500 लिटर पाणी पितो.
- एक सर्वसाधारण मानव एका दिवसात सरासरी 1 लिटर लाळ निर्माण करतो.
- एक नवजात बालक कमीत कमी 1 महिन्याचे होत नाही, तोपर्यंत ते अश्रू तयार करू शकत नाही.
- मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्याची एकूण 33 % वर्षे ही झोपण्यात खर्च करतो.
- मानवी दात हे शार्क माशाच्या दाताइतकेच मजबूत असतात.
- एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळातील तब्बल 1 वर्ष इकडे-तिकडे ठेवलेल्या वस्तू शोधण्यासाठी खर्च करतो.
- आपल्या शरीरातील रक्ताचे वजन हे शरीराच्या जवळपास 8 % पर्यंत असते.
- जवळपास 75 % लोक अंघोळीला सुरुवात करताना सर्वप्रथम डोक्यावर पाणी घेऊन सुरुवात करतात.
- मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कानातील हाड आहे, जे एका तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान आहे.
- ज्या हाताने आपण लिहितो, त्या हाताच्या बोटाची नखे हि दुसऱ्या हाताच्या नखापेक्षा तुलनेने जास्त वेगाने वाढतात.
- एक सर्वसाधारण मनुष्य एका दिवसात सरासरी 11,500 वेळा आपल्या डोळ्याची उघडझाप करतो.
- मनुष्य त्याने पाहिलेल्या एकूण स्वप्नांपैकी 90 टक्के भाग विसरून जातात.
- एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात तब्बल 35 टन अन्न खातो.
- ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या हाताच्या बोटांचे ठसे हे वेगवेगळे असतात तसेच, प्रत्येक मनुष्याच्या जीभेचेही वेगवेगळे ठसे उमटतात.
- मानवी शरीरातील यकृत हा एकमेव असा अवयव आहे, जो स्वतः ला पुन्हा निर्माण करू शकतो.
- एक व्यक्ती संपूर्ण दिवसभरात सरासरी 23,040 वेळा श्वास घेतो.
- मनुष्याच्या शरीरात इतकं कार्बन असतं की, त्यापासून तब्बल 100 पेन्सिली तयार केल्या जाऊ शकतात.
- एक मनुष्य त्याच्या आयुष्यातील सरासरी 5 वर्ष जेवण करण्यात खर्च करतो.
- एका मनुष्याची कवटी हि 29 विविध प्रकारच्या हाडांनी बनलेली असते.
- मानवी शरीरातील रक्तवाहिन्याची लांबी हि तब्बल 97,400 किमी आहे.
- एका सर्वसाधारण मनुष्याचे केस प्रतिवर्षी 6 इंच वाढतात.
- मानवाच्या शरीरातील हाडे हि एखाद्या स्टीलच्या रॉडपेक्षाही 5 पटींनी अधिक मजबूत असतात.
- आपल्या शरीरातील सर्वात मजबूत स्नायू हि आपली जीभ असते.
- मनुष्याच्या शरीरातून सरासरी 700 मिलीलीटर पाणी घामाच्या रूपात बाहेर पडते.
- मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमच्या तुलनेत 99 टक्के कॅल्शियम हे फक्त दातात असते.
- मानवी डोळ्यातील कॉर्निया हा शरीरातील एकमेव असा भाग आहे, जेथे रक्त पोहचत नाही.
- पुरुषांच्या तुलनेत स्रियांचे हृदय हे जास्त वेगाने धडकते.
- एक मनुष्य एका दिवसात सरासरी 10 वेळेस हसतो.
- मनुष्य डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही.
- मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे, जो सरळ रेषा ओढू शकतो.
- मानवी शरीरात एकूण बैक्टीरियाचे वजन सरासरी 2 किलो असते.
- एक चार वर्षाचा मुलगा एका दिवसात सरासरी 450 प्रश्न विचारतो.
- एका मनुष्याच्या शरीरात 206 हाडे असतात, तर एका नवजात बालकाच्या शरीरात 300 हाडे असतात.
- महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त वेळेस उचकी लागते.
- मनुष्याचा मेंदू दिवसाच्या तुलनेत रात्री अधिक सक्रीय असतो.
- हाताचे मधल्या बोटाची नखे हि इतर बोटांच्या नखांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढतात.
- मानवी मेंदू संपूर्ण शरीराच्या केवळ 2 % इतका असतोच, परंतु तो शरीराला लागणाऱ्या एकूण रक्त आणि ऑक्सिजन पैकी जवळपास 20 % एकटाच वापरतो.
- जर मेंदूला 5 ते 10 मिनिटांपर्यंत ऑक्सिजन मिळाला नाही तर, ते कायमस्वरूपी काम करणे बंद करेल.
- तुमचा IQ जितका जास्त असेल, तितके जास्त तुम्हाला स्वप्न पडतील.
- मानवी हृदय प्रत्येक दिवशी इतकी उर्जा निर्माण करते कि, एक ट्रक 30 किमी पर्यत चालवला जाईल.
- मानवाच्या शरीराला जो घाम येतो तो वासरहित असतो, घामाला दुर्गंधी हि त्यामध्ये मिसळल्या जाणाऱ्या बैक्टीरियामुळे येते.
- मानवी शरीरात 600 पेक्षाही अधिक मांसपेशी कार्यरत असतात.
- मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात 5 ते 6 लाख वेळेस हसतो.
- एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात जवळपास 1,20,000 किमी पायी चालतो.
- एक पुरुष त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातील जवळपास 1 वर्ष फक्त महिलांना बघण्यातच खर्च करतो.
- आपण खात असलेला मध कधीही खराब होत नाही.
- एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात 50 लाख वेळेस श्वास घेतो.
- एक पुरुष त्याच्या जीवनकाळातील तब्बल 6 महिने दाढी करण्यात खर्च करतो.
- एक मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात जवळपास 2.50 लाख वेळेस जांभई देतो.
- फक्त एक सिगरेट पिल्याने मनुष्याचे जीवन सरासरी 11 मिनिटांनी कमी होते.
- रात्री 7 तासापेक्षा कमी झोप हि आपले आयुष्य कमी करते..एका संशोधनानुसार 70 लाख व्यक्तींमध्ये फक्त एक व्यक्तीच 110 वर्ष जगू शकते.
- सर्वसाधारणपणे महिला एका दिवसात 3 वेळेस खोटे बोलतात तर पुरुष हे 6 वेळेस खोटे बोलतात.
- इतर महिन्यांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक बालके जन्म घेतात.
- आपली त्वचा हि संपूर्ण जीवनकाळात 900 पेक्षाही अधिक वेळेस स्वतः त बदल घडवून आणते.
- एक मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातील जवळजवळ 3 महिने टॉयलेटमध्ये व्यतीत करतो.
- मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात 5 ते 6 लाख वेळेस हसतो.
- महिला एका दिवसात सर्वसाधारण 20,000 शब्द बोलतात तर पुरुष फक्त सर्वसाधारण 7000 शब्द बोलतात.
- पुरुषांपेक्षा महिलांचे आयुष्य हे सरासरी जास्त असते.
- ज्यांचे मित्र अधिक असतात, असे लोक इतर लोकांहून अधिक काळ जिवंत राहतात.
- जगभरात जितके लोक नाहीत त्याच्या पेक्षाही अधिक सूक्ष्मजीव मनुष्याच्या शरीरावर वास करतात.
- आपण स्वप्ने तर पाहतो परंतु ते कोठून सुरु होते, हे आपल्याला आठवत नाही.
- मनुष्य त्याच्या जीवनकाळातील 6 वर्ष हे फक्त स्वप्न बघण्यातच खर्च करतो.
- आपण आपल्या संपूर्ण जीवनकाळात इतकी लाळ तयार करतो कि त्यातून १ स्विमिंग पूल भरेल
- स्वप्नात पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा आपण संपूर्ण आयुष्यात पूर्वी एकदातरी पाहिलेला असतो.
- एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात इतका पायी चालतो कि त्यामुळे पृथ्वीचे 5 चक्कर पूर्ण होतील.