(अदभुत / रंजक)
आपल्या मानवी शरीराची रचना जितकी जटील आहे आणि तितकीच ती मजेदारदेखील आहे. आपले शरीर हे खूपच गुंतागुंतीच्या बाबींनी युक्त असून संशोधक आजही आपल्या शरीराचा, शरीराशी निगडीत रोगांचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येतात. आजही अत्याधुनिक युगातही शरीराच्या काही बाबींबद्दल आपण अनभिज्ञच आहोत. अशाच मानवी शरीराशी संबंधित काही अचंबित करणाऱ्या बाबी जाणून घेऊ .
- मानवी दात हे खडकासारखे मजबूत असतात.
- एक सर्वसाधारण मनुष्य आपल्या हाताच्या कोपराला, स्वतःची जीभ स्पर्श करू शकत नाही.
- जे लोक रात्री जास्त काम करतात, शक्यतो त्यांचे वजन हे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं असते.
- मानवी नाक हे अब्जावधी प्रकारचे वास ओळखू शकतं
- माणसाचं डावं फुफ्फुस उजव्या फुफ्फुसापेक्षा 10 टक्क्यांनी लहान असतं.
- बहुतेक लोकांना झोप येण्यासाठी सरासरी 7 मिनिटे लागतात.
- एका सर्वसाधारण मनुष्याच्या एकूण हाडांपैकी 25 % हाडे ही पायात असतात.
- एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात सरासरी 60,500 लिटर पाणी पितो.
- एक सर्वसाधारण मानव एका दिवसात सरासरी 1 लिटर लाळ निर्माण करतो
- एक नवजात बालक कमीत कमी 1 महिन्याचे होत नाही, तोपर्यंत ते अश्रू तयार करू शकत नाही.
- मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्याची एकूण 33 % वर्षे ही झोपण्यात खर्च करतो.
- मानवी दात हे शार्क माशाच्या दाताइतकेच मजबूत असतात.
- एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळातील तब्बल 1 वर्ष इकडे-तिकडे ठेवलेल्या वस्तू शोधण्यासाठी खर्च करतो.
- आपल्या शरीरातील रक्ताचे वजन हे शरीराच्या जवळपास 8 % पर्यंत असते.
- जवळपास 75 % लोक अंघोळीला सुरुवात करताना सर्वप्रथम डोक्यावर पाणी घेऊन सुरुवात करतात.
- मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कानातील हाड आहे, जे एका तांदळाच्या दाण्यापेक्षाही लहान आहे.
- ज्या हाताने आपण लिहितो, त्या हाताच्या बोटाची नखे ही दुसऱ्या हाताच्या नखापेक्षा तुलनेने जास्त वेगाने वाढतात.
- एक सर्वसाधारण मनुष्य एका दिवसात सरासरी 11,500 वेळा आपल्या डोळ्याची उघडझाप करतो.
- मनुष्य त्याने पाहिलेल्या एकूण स्वप्नांपैकी 90 टक्के भाग विसरून जातात.
- माणसाचं हृदय त्याच्या संपूर्ण आयुष्यात 300 कोटींपेक्षा जास्त वेळा धडधडतं.
- माणसाच्या नाभीत 67 वेगवेगळ्या प्रजातींचे बॅक्टेरिया असतात.
- एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात तब्बल 35 टन अन्न खातो.
- ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या हाताच्या बोटांचे ठसे हे वेगवेगळे असतात तसेच, प्रत्येक मनुष्याच्या जीभेचेही वेगवेगळे ठसे उमटतात.
- मानवी शरीरातील यकृत हा एकमेव असा अवयव आहे, जो स्वतः ला पुन्हा निर्माण करू शकतो.
- दरवर्षी आपण चार किलो त्वचा पेशी गमावतो, म्हणजेच दरवर्षी इतक्या प्रमाणात त्वचेच्या पेशी नष्ट होतात आणि नवीन तयार होतात.
- एक व्यक्ती संपूर्ण दिवसभरात सरासरी 23,040 वेळा श्वास घेतो.
- मनुष्याच्या शरीरात इतकं कार्बन असतं की, त्यापासून तब्बल 100 पेन्सिली तयार केल्या जाऊ शकतात.एक मनुष्य त्याच्या आयुष्यातील सरासरी 5 वर्ष जेवण करण्यात खर्च करतो.
- कोणत्याही प्रकारची माहिती आपल्या नसांमध्ये ताशी 400 किलोमीटर वेगाने प्रवास करते.
- लाजून हसणं ही निसर्गानं सजीव प्राण्यांमध्ये फक्त मानवाला दिलेली देणगी आहे.
- एका माणसाची कवटी हि 29 विविध प्रकारच्या हाडांनी बनलेली असते.
- मानवी शरीरातील रक्तवाहिन्याची लांबी हि तब्बल 97,400 किमी आहे.