(रंजक/ अद्भूत)
ताजमहाल हा भारताचा अभिमान आहे, ज्यास जगभरातील अनेक पर्यटक भेट देतात. भारतात अनेक राजवाडे, किल्ले, मंदिरे आहेत. हे सर्वकाही भारताची सुंदरता वाढवतात. पण भारतात अनेक अशी ठिकाणे देखील आहेत जिथे रहस्य दडलेले आहेत. अनेक लोकांना ही रहस्ये माहित नाहीत. प्रेमाचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेला हा ताजमहाल त्याची पत्नी मुमताजच्या स्मृतिनिमित्त मोगल शासक शाहजहांने बांधला होता.
रहस्याचा विषय निघाला की ताजमहालचे नाव नक्कीच येते, ताजमहल ही भारताची शान आहे. ही सुरेख इमारत म्हणून नेहमीच चर्चेत असते, याची सुंदरता कोणालाही मोहवेल अशीच आहे. ताजमहलचा रंग, त्याची बांधणी, ठेवण सर्वकाही उत्कृष्ट आहे. मुमताजच्या स्मरणार्थ शहाजहान ने बांधलेली ही अलौकिक इमारत सुंदरतेची मूर्ती आहे. कथांनुसार, शाहजहांला एक इमारत बांधायची होती ज्यामध्ये अशी कोणतीही चूक असणार नाही परंतु मुमताज महलच्या थडग्याच्या अगदी वर छतावर एक छिद्र आहे. असे म्हटले जाते की शाहजहांने मजुरांचे हात तोडले होते. याबद्दल ऐकल्यानंतर एका कारागिराने मुद्दाम हे छिद्र ठेवले आहे.
पण आपण आता देशातल्या दुसऱ्या एका ताजमहालाबद्दल जाणून घेणार आहोत. हो, दुसरा ताजमहाल आहे. भोपाळमध्ये असा एक दुसरा ताजमहाल आहे. भोपाळ शहरात असे एक अनोखे ताजमहाल आहे ज्याचे अनेक किस्से आहेत. या ताजमहालच्या अशा दरवाजाबद्दल सांगणार आहोत, जो आजपर्यंत कोणालाही उघडता आला नाही. एवढेच नव्हे तर हा दरवाजा उघडण्यास सरकारही घाबरत आहे.
भोपाळचा हा ताजमहाल वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे. या ताजमहालमध्ये ना कबर आहे आणि नाही कोणाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. हा ताजमहाल कोणत्याही सम्राटाने बांधला नाही तर एका बेगमने हा ताजमहाल बांधला होता. तिचे नाव शाहजहां बेगम असे होते. त्या राजघराण्याची राणी राहिल्या आहेत आणि तिने राहण्यासाठी हे ताजमहाल बनवले आहे.
या ताजमहालमध्ये शेकडो खोल्या तयार करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये आठ मोठे हॉल आहेत. असे म्हणतात की शाहजहां बेगमच्या सर्व सभा आणि मोठ्या मेजवानी या सभागृहात होत असत. त्याचे बांधकाम वर्ष १८७१ मध्ये सुरू झाले आणि १८८४ मध्ये हे पूर्ण झाले. १३ वर्षात पूर्ण झालेला हा ताजमहाल अजूनही अगदी नवीन असल्यासारखेच दिसत आहे.
हा ताजमहाल पूर्वी ‘राजमहाल’ होता. असे म्हणतात की बेगम यांनी या ताजमहालचे नाव ‘राजमहल’ ठेवले होते. परंतु त्याची सुंदरता इतकी होती की नंतर त्याचे नाव ताजमहाल असे ठेवण्यात आले. सतरा एकरांवर बांधलेला हा ताजमहाल तयार करण्यासाठी त्यावेळी तीन लाख रुपये खर्च झाले होते. ताजमहाल बांधल्यानंतर बेगम इतकी आनंदी झाली की तिने तीन वर्षे याचा आनंद साजरा करत होती.
या ताजमहालला बाहेरून पाच मजले आणि आत दोन मजले आहेत. हत्तीसुद्धा दरवाजे तोडू शकत नाहीत. असे म्हणतात की या ताजमहालचे सौंदर्य हे त्याचे दरवाजे आहेत. शाहजहां बेगम ला हे दरवाजे अतिप्रिय होते. या दाराचे वजन एका टनापेक्षा जास्त आहे. जरी अनेक हत्ती एकत्रितपणे हे दरवाजे तोडू शकत नाहीत. या दाराचे आकार देखील इतके मोठे आहेत की, १६ घोड्यांसह एक बग्गीसुद्धा ३६० अंशात फिरू शकते. या दरवाजांच्या कोरीव कामात रंगीत काच वापरला आहे. जेव्हा सूर्याच्या किरण रंगीत ग्लासवर पडतात तेव्हा प्रकाशातून चमकणारा प्रकाश लोकांच्या डोळ्यावर पडतो. या दाराच्या आत जाण्यासाठी तसेच बाहेर येण्यासाठी आपल्याला डोके खाली करून जावे लागते.
इंग्रजांनाही या ताजमहालमध्ये प्रवेश करता आले नाही. एकदा, एक इंग्रज अधिकारी जेव्हा हा ताजमहाल पाहण्यासाठी आत गेला, तेव्हा त्याला त्या दाराजवळुन परत जावे लागले. या ताजमहालच्या दरवाजातून आत जाण्यासाठी मान खाली झुकलीच पाहिजे. परंतु ब्रिटीश अधिकाऱ्याला हे मान्य नव्हते. या दारावरील काच फोडायची सूचना इंग्रज अधिकाऱ्याने बेगमला केली, पण बेगमने हे स्पष्टपणे नाकारले. असे म्हणतात की, राणीच्या नकारानंतर ब्रिटीश अधिकाऱ्याचा पारा चढला आणि त्यानंतर लागोपाठ १०० वेळा गोळीबार केला परंतु तरीही तो हा दरवाजा तोडू शकला नाही. तेव्हापासून हा दरवाजा तसाच बंदिस्त ठेवण्यात आला आहे.
दरवाजा उघडायला स्थानिक लोकांचाही नकार आहे. ते असे मानतात की बेगमला हा दरवाजा उघडणे नको होते. आजही त्याठिकाणी बेगमचा आत्मा भटकतो असे मानले जाते. हा बेगमचा आत्मा आजही त्या दरवाजावर असल्याचे सांगण्यात येते. रात्रीच्या वेळेत या ठिकाणी एखादी मैफल बसत असल्याचा भास होत असल्याचे सांगितले जाते. हे या महालाचे एक रहस्य मानले जाते. तर अनेक वेळा चित्र विचित्र आवाजांनी हा महाल भारलेला असल्याचे स्थानिक सांगतात. या अनेक कारणांमुळे हा रह्स्यमयी दरवाजा तसाच कायम बंदिस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी अधिकारी वा नेते मंडळी मात्र हा दरवाजा उघडण्याच्या किंवा तोडण्याच्या भानगडीत पडत नाहीत.