(मुंबई)
बॉलिवूडचा प्रसिद्ध अॅक्शन हिरो जॉन अब्राहमने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. जॉनने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता जॉनबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. जॉनने मुंबईत नवा बंगला घेतला आहे. मुंबईतील खार भागातील लिंकिंग रोडवर आपले नवीन घर विकत घेतले आहे. जॉनच्या या बंगल्याचे नाव निर्मल भवन आहे, जो सुमारे 7,722 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे, ज्यामध्ये सुमारे 5,416 स्क्वेअर फूट जागेत बांधकाम करण्यात आले आहे.
या बंगल्याची किंमत 70.83 कोटी रुपये आहे. बंगल्याचा हा सौदा 27 डिसेंबर 2023 रोजी झाला असून अंदाजे 4.24 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरण्यात आले आहे. अतिशय सुंदर दृश्य असलेला हा बंगला समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. जॉनचा हा नवा बंगला खारच्या पॉश लिंकिंग रोडवर आहे. यापूर्वी जॉनने २००९ साली एक घर खरेदी केले होते. यूनियन पार्कच्या शेजारी असलेल्या शाळेच्या बाजूला एका पारसी कुटुंबाकडून त्याने हे घर खरेदी केले होते. त्यानंतर आता पुन्हा जॉनने नवे घर खरेदी केले आहे.
खार परिसरात अनेक बॉलिवूड कलाकार आणि उद्योगपतींचे बंगले आहेत. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना तेथे राहण्याची इच्छा असते. या भागात पर क्वेअरफिट १ ते दीड लाख रुपये जागेचा भाव आहे. शुक्रवारी अभिनेता आमिर खानच्या वांद्रे येथील सोसायटीची रीडिवलेपमेंट डिल देखील झाली आहे. काही महिन्यापूर्वीच अभिनेत्री प्रीती झिंटाने पाली हिल येथे १७.०१ कोटी रुपयांचा एक फ्लॅट खरेदी केला होता. याशिवाय गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी फ्लॅट आणि बंगले खरेदी केले होते.