(मुंबई)
राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. याअंतर्गत पोलिसांनी नुकतीच ‘सोशल मीडिया लॅब’ सक्रिय केली आहे.
मुंबई पोलिसांकडून जातीयवादी व आक्षेपार्ह सक्रिय केलेल्या आतापर्यंत अशा 3000 पोस्ट ‘सोशल मीडिया लॅब’च्या माध्यमातून हटवण्यात आल्या आहेत, ज्यांचा वापर जातीय तेढ भडकवण्यासाठी केला जाणार होता.
सध्या चर्चेत असलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “राज्याचे पोलीस आणि मुंबई आयुक्त बसून निर्णय घेतील आणि लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवतील. अशी परिस्थिती (धार्मिक तणाव) हाताळण्यासाठी पोलीस तैनात असतात. कोणत्याही प्रकारचा तणाव होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.