( रंजक / अद्भूत )
एव्हरेस्ट हा ग्रहावरील सर्वात मोठा पर्वत आहे, सध्या त्याची उंची 8,848 मीटर आहे. तो नेपाळ आणि चीनच्या सीमेवर असलेल्या हिमालयातील महालंगूर-हिमाल पर्वत रांगेत प्रवेश करतो. एव्हरेस्टच्या विलक्षण उंचीने प्राचीन काळापासून तिबेटच्या स्थानिक लोकसंख्येलाही प्रभावित केले आहे. जगभरातील अनेक लोकांना या एव्हरेस्टच आकर्षण आहे आणि त्यामुळेच दरवर्षी जगभरातील किमान 800 लोक याच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातील काहीच लोक तिथे पोहोचतात आणि रेकॉर्ड करतात. तर काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पृथ्वीवर जेव्हा मनुष्य जन्मास आला तेव्हापासून हजारो वर्षापर्यंत माउंट एव्हरेस्ट वर चढाई अशक्य मानले जात होते. त्यावेळी मनुष्याला या पर्वताच्या शिखरावर पाय ठेवणे आता चंद्रावर जाण्याएव्हढे अशक्य वाटत होते. पण 29 मे 1953 रोजी शिखरावर पहिली यशस्वी चढाई झाली होती.
एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर सर करण्याची अनेकांची महत्वाकांक्षा असते. तर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकालाच हे जमते असे नाही. काही लोक अनेक कारणांमुळे या बर्फातच कायमचे गाडले जातात. ‘आतापर्यंत सुमारे ४००० पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी ७००० पेक्षा जास्त वेळा हे शिखर सर केले आहे. त्यामुळे हल्ली एव्हरेस्ट सर करणे ही काही नवी महत्वाकांक्षा आहे किंवा नवे आव्हान आहे असे अजिबात नाही.
माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले लोक हे न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या नेतृत्वाखालील मोहीम होते. त्यांच्या यशाने केवळ इतर उत्साही लोकांची आवड पूर्ण केली नाही, तर या दोन गिर्यारोहकांनी हे अशक्य काम शक्य केले होते आणि पहिल्यांदा या पर्वतावर चढून इतिहासात आपलं नाव ऍड केलं होतं.
या पर्वतावर गिर्यारोहकांना अनेक समस्या येतात. जसजसे वर जाऊ तसतसे तेथील ऑक्सीजनची पातळी कमी होते. तसेच अतिथंड वातावरणामुळे काहींचे शरीर गोठते व त्यातच त्यांचा मृत्यू होतो. शिवाय अचानक वातावरण बिघडून बर्फाचे वादळ येते व गिर्यारोहकांना आपला जीव गमवावा लागतो. म्हणूनच एव्हरेस्ट च्या 8000 मीटर पासून पुढे ‘डेथ झोन’ म्हणलं जातं.
एव्हरेस्ट हा आता पहिल्या सारखा कौतुकाचा विषय राहिला नाही कारण आता 4000 पेक्षा जास्त लोकांनी हे शिखर सर केले आहे. त्यामुळे आता एव्हरेस्टवर चढणे ही काही नवीन महत्वकांक्षा नाही किंवा नवीन आव्हान नाही. गेल्या काही वर्षात गाईडच्या साहाय्याने गिर्यारोहणाचा अनुभव नसणारे लोकही एव्हरेस्ट वर जाऊन आले आहेत. तर अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक गिर्यारोहकांची टीम येथील वादळात बर्फाखाली गाडले आहेत. अशा स्थितीत मृतदेहांचा ढीग तयार होतो. या ‘डेथ झोन’ जवळ अंदाजे 200 ते 300 मृतदेह आहेत त्या स्थितीत पडून असल्याचे सांगितले जाते. पण हे मृतदेह तिथून का काढले जात नाहीत?
सध्यातरी एव्हरेस्टवर असे किती मृतदेह पडून आहेत यांचा नेमका आणि अचूक आकडा कुणाला सांगता येणार नसला तरी किमान २०० हून तरी अधिक मृतदेह तिथे असावेत असा अंदाज आहे. गिर्यारोहक आणि त्यांना मार्ग दाखवणारे शेरपा असेच बर्फाखाली, हिमनद्यामध्ये किंवा हिमवृष्टीमध्ये बुजून गेले आहेत. कधी कधी त्यांच्या मृत शरीरावरील बर्फ थोडासा इकडे तिकडे सरकतो आणि त्यांचा एखादा अवयव तेवढा दृष्टीस पडतो. अनेक जण तर अगदी गाढ विश्रांती घेत असल्यासारखे दिसतात. अनेकांचे मृतदेह म्हणजे वाटेवरील मैलाचे दगडच बनले आहेत.
डेथ झोन मध्ये पडलेले मृतदेह दुसऱ्या लोकांसाठी गुगल मॅप सारखे काम करतात कारण इथं आल्यानंतरच लोकांना कळते की इथून आता माउंट एव्हरेस्ट पूर्ण करण्यासाठी 848. 86 मीटर अंतर राहिले आहे. अनेक मृतदेह तर मैलाचे दगड बनले आहेत. पण दरवर्षी वाढणाऱ्या मृत्यू मुळे तेथील मृतदेहांची संख्या वाढत चालली आहे. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा मानवाचे शरीर हे कुजते व त्याचा वास येतो. पण माउंट एव्हरेस्टच्या डेथ झोन मध्ये ज्यांचा मृत्यू होतो तो वर्षानुवर्षे आहे त्याच कंडिशन मध्ये राहतो. कारण तिथे तापमान -14 ते -16 असल्यामुळे बॉडी तशाच राहतात. ना ते मृतदेह कुजतात ना त्यांना कोणता जनावर खातो. त्यामुळे तेथील मृतदेहांची संख्याही वाढत चालली आहे.
बर्फाळ ठिकाणांवर उतार खूप असतो आणि ऑक्सिजनची पातळी कमी असणाऱ्या ठिकाणाहून बर्फाची साठलेली गादी खोडून, खणून मृतदेह बाहेर काढणे हे जोखमीचे काम आहे. अशावेळी ते मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या लोकांच्या जीवालाही धोका असू शकतो. जेव्हा तो बर्फ तोडण्याचा प्रयत्न केल्यास तेव्हा मोठ्या प्रमाणात लॅन्डस्लाईड होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे अन्य गिर्यारोहकांना धोका होऊ शकतो. या कारणामुळे एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झाल्यास मृतदेह खाली आणले जात नाहीत, तर कालांतराने ते बर्फात गडब होतात.