(रंजक)
शिवपुराणानुसार, त्रेतायुगात श्रीरामाची सहायता करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी महादेवाने वानर रुपात हनुमान अवतार घेतला होता. हनुमानाला महादेवाचा श्रेष्ठ अवतार म्हटले जाते. जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मणावर एखादे संकट आले तेव्हा हनुमानने ते आपल्या बुध्दी आणि पराक्रमाने दूर केले. वाल्मीकि रामायणच्या उत्तर कांडमध्ये स्वयं श्रीराम म्हणाले आहेत की, हनुमानाच्या पराक्रमामुळेच त्यांनी रावणावर विजय प्राप्त केला आहे. त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानाच्या काही पराक्रमांविषयी सांगत आहेत. जे पराक्रम कींवा विशेष कामे दुसरे कोणीच करु शकले नसते.
अनेक राक्षसांचा वध :
युद्धामध्ये हनुमानाने अनेक पराक्रमी राक्षसांचा वध केला. यामध्ये धूम्राक्ष, अकंपन, देवांतक, त्रिशिरा, निकुंभ हे प्रमुख होते. हनुमान आणि रावणामध्ये भयंकर युध्द झाले होते. रामायणानुसार भुकंप आल्यावर ज्या प्रकारे पर्वत हादरतात त्याच प्रकारे रावण हनुमानाने गालात मारल्यावर हादरला होता. हनुमानाचा हा पराक्रम पाहून तेथे उपस्थित सर्व वानरांमध्ये आनंद परसला होता.
समुद्र ओलांडणे :
माता सीतेला शोधण्यासाठी जेव्हा हनुमान, अंगद, जामवंद हे वीर समुद्र तटावर पोहोचले तेव्हा 100 योजन विशाल समुद्र पाहून सर्वाचा उत्साह कमी झाला. तेव्हा अंगदने तेथील सर्व पराक्रमी वानरांना त्याची झेप घेण्याच्या क्षमतेविषयी विचारले. तेव्हा काही वानर म्हणाले की, मी 30 योजन झेप घेऊ शकतो काही म्हणाले 50 योजन झेप घेऊ शकतो. ऋक्षराज जामवंत म्हणाले मी 90 योजन झेप घेऊ शकते. सर्वांचे बोलणे ऐकून अंगदने सांगितले की, मी 100 योजन झेप घेऊन समुद्र पार करेन, परंतु परत येऊ शकेन की नाही यामध्ये संशय आहे. तेव्हा जामवंदने हनुमानाला त्याचे बळ आणि पराक्रमचे स्मरण करुन दिले आणि हनुमानाने 100 योजन विशाल समुद्र एका झेपेत पार केला.
सीता माताचा शोध :
समद्र ओलांडल्यानंतर जेव्हा हनुमान लंकेला पोहोचले तेव्हा लंकेच्या व्दारावर लंकिनी नावाच्या राक्षसीने त्यांना थांबवले. हनुमानाने तिला परास्त करुन लंकेत प्रवेश केला. हनुमानाने सीता माताला खुप शोधले, परंतु ती कुठेच दिसली नाही. तरी देखील हनुमानाचा उत्साह कमी झाला नाही. सीता माता दिसली नाही तेव्हा हनुमानाने विचार केला की, रावणाने सीतेचा वध तर केला नसेल, हा विचार करुन त्यांना खुप दुःख झाले. परंतु नंतर ते लंकेच्या अन्य ठिकाणांवर सीता माताला शोधू लागले. अशोक वाटिकेत जेव्हा हनुमानाने सीता माताला पाहिले तेव्हा ते खुप खुश झाले. अशा प्रकारे सीता मातेला शोधण्याचे हे कठिण काम हनुमानाने खुप सहजतेने केले.
अक्षयकुमारचा वध आणि लंका दहन :
सीता मातेला शोधल्यानंतर हनुमानाने त्यांना श्रीरामचा संदेश ऐकवला. यानंतर हनुमानाने अशोक वाटिकेला नष्ट केले. शत्रुच्या शक्तीचा अंदाज लावण्यासाठी त्यांनी असे केले. जेव्हा रावणाचे सैनिक हनुमानाला पकडायला आले तेव्हा हनुमानाने त्यांचा वध केला.
तेव्हा रावणाने आपला पराक्रमी पुत्र अक्षयकुमारला पाठवले, हनुमानाने त्याला देखील मारले. हनुमानने आपला पराक्रम दाखवत लंकेला आग लावली. पराक्रमी राक्षणांनी भरलेल्या लंकेत जाऊन सीतेला शोधने आणि राक्षसांचा वध करुन लंका जाळण्याचे साहस हनुमानने खुप सहज केले.
विभीषणाला आपल्या पक्षात घेणे :
श्रीरामचरित मानस नुसार, जेव्हा हनुमान लंकेत सीता माताला शोधत होते, तेव्हा त्यांची भेट विभीषणसोबत झाली. रामभक्त हनुमानला पाहून विभीषण खुप प्रसन्न झाले आणि विचारले की, राक्षस जातीचा असून देखील श्रीराम मला त्यांच्या शरणात घेतील का, तेव्हा हनुमान म्हणाले की, श्रीराम आपल्या सर्व सेवकांवर प्रेम करतात. जेव्हा विभीषण रावणाला सोडून श्रीरामाच्या शरणमध्ये आला तेव्हा सुग्रीव, जामवंत हे म्हणाले की, हा रावणाचा भाऊ आहे. यामुळे यावर विश्वास ठेवू नका. त्या स्थितीमध्ये हनुमानाने विभीषणचे समर्थन केले. शेवटी, विभीषणच्या परामर्शानेच श्रीरामाने रावणाचा वध केला.
राम- लक्ष्मणसाठी पर्वत घेऊन येणे
वाल्मीकि रामायणाप्रमाणे युध्दामध्ये रावणाचा पुत्र इंद्रजीतने ब्रम्हास्त्र चालवून श्रीराम आणि लक्ष्मणाला बेशुध्द केले. तेव्हा ऋक्षराज जामवंतने हनुमानाला सांगितले की, तु तात्काळ हिमायल पर्वतावर जा, तेथे तुला ऋषभ आणि कैलास शिखर दिसतील. त्या दोघांच्यामध्ये एक औषधिंचे पर्वत आहे, ते पर्वत तु घेऊन यावे. जामवंताने सांगितल्या प्रमाणे हनुमानाने पर्वत आणण्यासाठी तात्काळ झेप घेतली. आपली बुध्दी आणि पराक्रमाच्या बळावर हनुमानाने ते औषधिंचे पर्वत वेळेत उचलून आणले. त्या पर्वतावरील औषधींच्या सुगंधाने राम-लक्ष्मणासोबतच कोटींनी जखमी झालेले वानर पुन्हा स्वस्थ झाले