(रत्नागिरी)
रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण. रत्नदुर्गाच्या कुशीत वसलेले आपले टुमदार शहर, जगभरातील पर्यटकांना भुरळ पडते ती इथल्या निसर्गदत्त हिरवळीची. मांडवी, भाटयाच्या समुद्रकिनायाची आणि टिळक, सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या येथील वास्तुची. येथे राहणाऱ्या व बाहेरून येणाऱ्याना मात्र वस्तुस्थिती दिसते ती मात्र थोडी मन खिन्न करणारी. आजपर्यंत अनके लोकांनी रात्रीच्यावेळी आपले प्राण गमावले आहेत. पण गुरे मोकाट का सोडली जातात, या मागचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की रत्नागिरीमधील परिस्थिती वेगळी आहे.
चार महिण्याच्या शेतीनंतर पुढील आठ महिने या गुरांना काय खायला घालायचे कसे पोसायचे ? त्यामुळे गुरांना सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. या संदर्भात चर्चा होतात, थांबतात प्रतयक्षात कृती मात्र काहीच नाही. रत्नागिरीतील एका दानशूर कुटुंबाने पाऊल उचलले आणि रत्नागिरी जवळील निसर्गरम्य ठिकाणी सोमेश्वराच्या छत्र छायेखाली गुरांना आसरा देण्यासाठी 5 एकर जागा दिली आहे. मग या संदर्भात मनापासून काम करणारे काही लोक एकाच ध्येयाने एकत्र आले. आणि सोमेश्वर विश्वमंगल गो शाळा आणि विज्ञान केंद्राची कल्पना मांडली त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. पण एकटया दुकटयाचे ते काम नाही. यासाठी समस्त रत्नागिरीकरांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवली आहे.
रत्नागिरी शहर परिसरातील भटकी गुरे ही शहर परिसरातील नागरिकांची व येणाऱ्या पर्यटकांच्या समोरील मोठी समस्या बनत आहे. खर तर शेतीप्रधान भारतामध्ये निरुपयोगी बनत चाललेल्या पशुंसाठी प्रयोगशील पध्दतीने संगोपन करण्याचे अनेक दिवस आमच्या मनात होते. सातत्याने विद्यार्थी, कर्मचारीवर्ग आणि शहर परिसरातील वाहतूक यांना मोकाट गुरांचा त्रास सहन करावा लागतोय. वाहनांच्या समोरिल अडथळे व बाजारपेठांमधील गुरांचे रस्त्यामध्येच ठिय्या देवून बसणे. या गोष्टी रत्नागिराकरांसाठी नित्याच्याच समस्या झाल्या आहेत.
वाहने चालवतांना होणारे अपघात कमी करता येतील का ? आठवडा बाजारात विक्रेत्यांना बिनधास्त फळे व भाजी पाल्याची विक्री करता येईल का ? बाजारात फिरतांना गुरांचा होणारा अडथळा कमी करता येईल का ? बदलत असलेल्या जीवनशैलीमुळे अनेक बाबी निरुपयोगी वाटतात. रत्नागिरीत गाई, गुरे व वासरे यांचे बेवारसपणे फिरणे हीच बाब दर्शवते. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी आम्ही सोमेश्वर शांतिपीठाच्या वतीने पाच एकर जागेत गोशाळा व गो विज्ञान केंद्र सुरु करण्यात येत आहे. आपण खालील प्रकारे सहकार्य करून या ईश्वरी कार्यात सहभागी होऊ या, असे आवाहन करण्यात आले आहे.
1) प्रत्यक्ष आपल्या घरातील दिवंगत व्यक्तीच्या नावाने गोशाळा बांधणे.
2) गोमाता दत्तक घेणे. ( गो शाळेत गाईचे संगोपन केल जाईल, खर्चाची व्यवस्था करणे
3)गाईंच्या चाऱ्याच्या खर्चाची व्यवस्था करणे. (एका गाईला एका महिण्याला 3000 रु. याचा चारा लागतो.
4) गोशाळा बांधण्यासाठी वस्तूरूप मदत करणे. (स्टील, पत्रे, दगड, वाळू, सिमेंट व इतर
5) गोशाळेला प्रत्यक्ष देणगी रुपात मदत करणे.
6) कुटुंबाने एक गाय दत्तक घेणे व कुटुंबासह गोशाळेला भेट देवून गो सेवा करणे
7) गो उत्पादन वापरणे व समाजात गोमातेच्या विषयी प्रबोधन करणे.
सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी सोमेश्वर विश्व मंगल गोशाळा व गोविज्ञान केंद्र सोमेश्वर शांतीपिठाच्या मार्फत रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली. सदर पत्रकार परिषदेमध्ये राजेश आयरे, संतोष पावरी, रवींद्र इनामदार, अनुजाताई पेटकर, विनोद पेटकर, देवेंद्र झापडेकर, छाया अनावकर, राकेश वाघ, संजय जोशी, सोमेश्वर ट्रस्टचे सगळे सदस्य उपस्थित होते. सोमेश्वर शांतीपिठामार्फत दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी चार वाजता सोमेश्वर येथील श्री शशिकांत सोहनी यांनी दान केलेल्या पाच एकर जागेमध्ये भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमेश्वर शांतीपिठामार्फत भविष्यात गोशाळा योगाश्रम, निसर्गोपचार केंद्र, वनऔषधी निर्मिती व बाल संस्कार केंद्र ,फळ प्रक्रिया उद्योग केंद्र व वृद्धाश्रम अशा विविध विषयाला अनुसरून या ठिकाणी काम करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात दिनांक 4 जानेवारीला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाने होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व रत्नागिरीवासियांच्या वतीने या कार्यक्रमांमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
श्री संतोष पावरी यांनी विश्व मंगल गोशाळेच्या माध्यमातून गो वंश, गो वंशाचे रक्षण गोआधारित कृषी व्यवस्था, कृषी आधारित अर्थनीती स्वास्थ्य नीति आणि ऊर्जा नीती या माध्यमातून या गोशाळेमार्फत गो विज्ञानाचे काम करण्यात येणार आहे असे पत्रकारांना सुचित केले. श्री रवींद्र इनामदार यांनी भविष्यामध्ये हा हा प्रकल्प फार मोठी कामगिरी करणार आहे असे सूचित केले.