बालपणी मुलाची उंची वाढावी म्हणून त्याला झाडाला लटकायला सांगितले जात असे. काही जण तर उंची वाढावी म्हणून सकाळ सकाळी पोहायला जात असत. उंची न वाढण्यामागे काही प्रमाणात अनुवंशिकता पण कारणीभूत असते. भारतात एक असे कुटुंब आहे ज्याने याच उंचीचा विक्रम मोडला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुण्याच्या कुलकर्णी कुटुंबाचा यात समावेश होत आहे. महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. कुलकर्णी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची उंची ६ फुटापेक्षा जास्त आहे. भारताची सर्वसाधारण माणसांची उंची साडे पाच फूट उंचीपर्यंत आहे. उंचीने लांब असलेल्या लोकांना नेहमी डिसेंट व्यक्तिमत्व असेलेले व्यक्ती समजले जाते. प्रत्येकाला चांगली उंची हवी असते परंतु सर्वांना चांगली उंची मिळत नाही कारण हे पूर्णपणे शरीरातील हॉर्मोन व जीन्स वर अवलंबून असते. ह्या परिवारामधील सर्वांची उंची जवळपास 26 फूट आहे.
लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दाखल आहे नाव
पुण्यामध्ये राहत असणाऱ्या ह्या परिवार मधील सदस्यांची उंची नॉर्मल लोकांच्या लांब उंची एवढी नसून ह्या परिवारामधील पती-पत्नीच्या जोडीला अनेक प्रकारचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. ह्या पती-पत्नीची उंची प्रत्येकाला त्यांच्यावर आकर्षित करते, एवढच नाही तर या परिवारामधील मुले देखील लांब उंचीबाबत खूप नशीबवान आहेत आणि कुठल्याही नॉर्मल मुलांपेक्षा ह्या मुलांची उंची खूप जास्त आहे. त्यांच्या लांब उंचीमुळेच ह्या परिवाराचे नाव लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लिहिले गेले आहे. पुण्यामध्ये राहणाऱ्या या परिवाराला त्यांच्या लांब उंचीमुळे अनेक फायदे होत असले तरी ह्याच उंचीमुळे त्यांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना देखील करावा लागत आहे. या मागील मुख्य कारण हे आहे कि, आपल्या देशातील नॉर्मल व्यक्तींची उंची जास्तीत-जास्त ६ फूट एवढीच मानली जाते व ह्याच्या हिशोबानेच प्रत्येक वस्तूला बनवले जाते. पण ह्या परिवारामधील सर्व सदस्यांना त्यांच्या उंचीनुसार सर्व गोष्टींना समायोजित करणे खूप अवघड जाते आणि म्हणूनच बऱ्याच वेळा त्यांना अडचणींचा देखील सामना करावा लागतो.
पण या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची उंची साधारण सहा फुटापेक्षा जास्त आहे. त्यांच्या घरातील सर्वांची उंची २६ फूट आहे. शरद कुलकर्णी हे कुलकर्णी कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांची उंची ७ फूट १.५ इंच आहे. शरद आणि संजोग हे दोघे जोडपे भारतामधील सर्वात उंच जोडपे आहे. त्यांच्या नावावर तसा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे. कुलकर्णी घरातील मुली पण उंच आहेत. या कुलकर्णी कुटुंबाचे वैशिष्ठ्य म्हणजे हजारो लोकांच्या गर्दीत पण ते चांगलेच उठूनच दिसतात. कुलकर्णी कुटुंब यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा कमी वापर करतात. गरज असेल तिथे ते शक्यतो दुचाकी वरूनच प्रवास करतात. कुलकर्णी कुटुंबाच्या नावावर एक आगळा वेगळा विक्रम झाला असल्याने आपल्या उंचीबद्दल कुलकर्णी कुटुंबियांना अभिमान असल्याचे ते सांगतात.