( सौंदर्य )
जेव्हा आपल्या डोळयांखालील रक्तवाहिन्या अधिक तीव्र होत असतात. तेव्हा त्या आपल्या त्वचेद्वारे अधिक दृश्यमान होत असतात. ज्यामुळे आपल्या डोळयाच्या अवतीभोवती एक डार्क कलर तयार होत असतो, ज्याला आपण डार्क सर्कल असे म्हणत असतो.
डोळ्यांखाली असणारे Dark Circle आपल्या सौंदर्यात अडचणीचे ठरतात. इतकंच नाही तर डार्क सर्कल असणं हे आपल्या त्वचेचं आरोग्य ठीक नसण्याचे लक्षण आहे. खरंतर अनेक कारणांनी आपल्या त्वचेचं आरोग्य खालावत असतं. आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे डार्क सर्कल सारखे त्वचेचे आजारांची लागण आपल्याला लगेच होते. अनुवंशिक जर आपल्या कुटूंबियांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर आपल्या देखील डोळ्यांखाली अनुवंशिकरीत्या डार्क सर्कल येण्याचा धोका असतो. अनुवंशिकरीत्या आपल्या त्वचेमध्ये हाइपरपिग्मेंटेशन होतं. ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा डार्क होऊ लागते. तसं पाहिलं तर डार्क सर्कलची समस्या कोणालाही उद्भवू शकते. परंतु, या समस्येमुळे सर्वाधिक जे लोक प्रभावित होतात, त्यामध्ये…
- वयस्कर व्यक्ती 2. अनुवांशिक समस्या (Periorbital Hyperpigmentation) 3. उशिरापर्यंत काम करणारे यांना डार्क सर्कलची समस्या कोणाला होऊ शकते.
डार्क सर्कल (काळी वर्तुळे) असण्याची कारणे काय आहेत ?
तसं पाहिलं तर डोळ्याखाली काळी वर्तुळे असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु, काही सामान्य कारणांमध्ये खालील कारणांचाही समावेश
थकवा
आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणे, खूप थकवा किंवा झोपेच्या समस्येमुळे रात्री उशिरापर्यंत जागं राहण्यामुळेही डार्क सर्कलची समस्या उद्भवू शकते. जेव्हा अनेक आठवडे आपल्याल पुरेशी झोप मिळत नसेल, आपल्यावर कामाचा ताण वाढत असेल तर आपल्या डोळ्यांवर थकवा येऊ लागतो. ज्यामुळे पापण्यांना सुज आणि डोळ्यांखाली खड्डे तयार होऊ लागतात. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांच्या चारही बाजूची त्वचा कमकुवत आणि सैल पडते. त्यामुळे त्वचेच्या खालील बाजूस असलेल्या रक्तवाहिन्या आणि डार्क टिश्यूंच्या एकत्रितपणामुळे काळी वर्तुळे तयार होतात. कमी झोपही डोळ्याच्या खाली द्रव्य तयार होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे डोळ्याखालील त्वचा सुचल्यासारखी दिसते. त्यामुळे अनेकवेळा जे डार्क सर्कल दिसतात. ते तुमच्या सुजलेल्या पापण्यांची सावली असते.
वय
वय वाढणे हेही डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे बनण्याचे सामान्य कारण असू शकते. जसजसं तुमचं वय वाढतं तसतशी तुमची त्वचा सैल होण्यास सुरुवात होते. त्वचेला खेचून ठेवणारे फॅट आणि कोलोनही कमी होऊन संपुष्टात येतात. जेव्हा हे फॅट आणि कोलोन संपतात, तसे त्वचेच्या खाली असलेल्या नसांचा रंग गडद होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सैल पडलेल्या त्वचेच्या खाली नस बाहेर दिसू लागते आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग गडद दिसू लागतो.
डोळ्यांचा थकवा
बहुतांश वेळा अति टीव्ही पाहिल्यामुळे किंवा कॉम्प्युटर स्क्रिनच्या समोर जास्त बसल्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो. या थकव्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या नसा पसरतात. त्यामुळे डोळ्यांच्या जवळपासची त्वचा डार्क दिसायला लागते.
अॅलर्जी
जर आपण गेल्या काही काळात नवा आय मेकअप केला असेल किंवा कोणता नवा मस्करा वापरत असाल तर हे देखील आपल्या डोळयांखाली डार्क सर्कल येण्यास कारणीभूत ठरू शकतात. मस्करा किंवा आय मेकअप मध्ये असलेली रसायनं डोळ्यात जाऊ शकतात. ज्यामुळे डोळ्यांमधून पाणी येणं, डोळे लाल होणं किंवा त्यांनी सूझ येणं, शिवाय डार्क सर्कल यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. अनेकवेळा अॅलजीमुळे होणाऱ्या रिअॅक्शन आणि डोळ्यांच्या कोरडेपणामुळेही डार्क सर्कल वाढू लागतात. शरीराचे बचाव तंत्र नुकसान पोहोचवणाऱ्या बॅक्टेरियाशी निपटण्यासाठी हिस्टामाइंस रिलीज करतात. हिस्टामाइंसमुळे नसा पसरतात आणि त्यांचा रंग गडद होतो. त्याचबरोबर ते त्वचेच्या खाली आणखी जास्त दिसू लागतात. अॅलर्जीशिवाय खाज, लाल चकत्या पडणे आणि जेव्हा डोळे सूजतात तेव्हाही शरीर हिस्टामाइंसला सक्रिय करु शकतो. अॅलर्जीमुळे अनेकवेळा डोळ्याच्या त्वचेच्या बाजूला खाजवण्याचा मोह होतो. त्यामुळे त्रास वाढतो आणि त्यामुळे नसा सूजणे आणि तुटण्याची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळेही डोळ्यांच्या चारही बाजूला काळे वर्तुळे येऊ शकतात.
पाण्याची कमतरता
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे होणे ही सामान्य गोष्ट आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही तर डोळ्यांच्या खालील त्वचा निर्जीव होते आणि कोरडी दिसू लागते. डोळ्यांच्या खालील हाड त्वचेच्या जवळ असल्यामुळेही असे होते.
उन्हामुळे
उन्हात जास्त वेळ राहिल्याने शरीरात जास्त प्रमाणात मेलानिन तयार होते. मेलानिन हा त्वचेला स्वतःचा रंग देतो. आवश्यकतेपेक्षा जास्त काळ उन्हात राहिल्याने डोळ्याच्या चारही बाजूच्या त्वचेचा रंग गडद होऊ शकतो.
अनुवांशिक/जेनेटिक्स
जर कुटुंबातील कुणाला डार्क सर्कलची समस्या असेल तर ती तुम्हालाही जाणवू शकते. काहींना याची लक्षणे लहानपणीच दिसू लागतात. तर अनेकांना वय वाढण्याबरोबर वर्तुळे वाढू लागतात किंवा कमी होऊ लागतात. अनुवंशिक जर आपल्या कुटूंबियांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर आपल्या देखील डोळ्यांखाली अनुवंशिकरीत्या डार्क सर्कल येण्याचा धोका असतो. अनुवंशिकरीत्या आपल्या त्वचेमध्ये हाइपरपिग्मेंटेशन होतं. ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा डार्क होऊ लागते.
इतर आजारांमुळे
अनेकवेळा काही आजारांमुळेही डार्क सर्कल होऊ शकतात. थायरॉइडमुळेही डोळ्यांच्या चारी बाजूला डार्क सर्कल होतात. काही औषधांच्या सेवनामुळेही ही समस्या उद्भवू शकते.
जाणून घ्या डोळ्यांवरील काळी वर्तुळे दूर करण्याचे घरगुती उपाय
टोमॅटो आणि लिंबू
टोमॅटो डार्क सर्कल कमी करण्याबरोबरच त्वचा मुलायमही बनवते. तुम्ही एक चमचा टोमॅटोचा ज्यूस घ्या, त्यात एक चमचा लिंबू मिसळा आणि त्याचे मिश्रण डोळ्यांभोवती लावा. ते 10 मिनिटांपर्यंत ठेवा आणि त्यानंतर धुवून घ्या. हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्यानंतर डार्क सर्कल हळूहळू कमी होऊ लागतात.
बटाट्याचा रस
डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी बटाटा रामबाण उपाय आहे. कच्च्या बटाट्याचा ज्यूस काढून घ्या. कापसाचा छोटा तुकडा बटाटाच्या रसात भिजवून डोळ्याभोवती ठेवा. काळी वर्तुळे असलेल्या संपूर्ण भागावर कापूस ठेवला जाईल याची काळजी घ्या. एका आठवड्याच्या आत तुम्हाला परिणाम दिसायला सुरुवात होईल.
टी-बॅग
टी- बॅगच्या मदतीनेही तुम्ही डार्क सर्कल्सपासून सुटका करुन घेऊ शकता. यासाठी ग्रीन टी ची बॅग चांगली असते. ग्रीन टी बॅगच्या वापरानंतर ती फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा ही टी-बॅग पूर्णपणे थंड होईल. तेव्हा ती डोळ्यावर ठेवून द्या. ही प्रक्रिया आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा करु शकतो.
बदामाचे तेल
बदामात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन इ आढळते. बदामाचे तेल त्वचा कोमल बनविण्यास मदत करते. डार्क सर्कल्ससाठी रात्री थोडेसे बदाम तेल डोळ्यांच्या आसपास लावावे. हलक्या हाताने मसाज करा आणि झोपा. सकाळी उठून डोळे थंड पाण्याने चांगल्या पद्धतीने धुवून घ्या. आठवड्यात याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल.
थंड दूध
थंड दूधाचा सातत्याने वापर केल्याने केवळ डार्क सर्कल्स संपुष्टात येत नाहीत तर डोळे ही चांगले होतात. तुम्हाला फक्त कापसाचा बोळा एका भांड्यात ठेवलेल्या थंड दूधात बुडवायचं आणि पुन्हा ते डार्क सर्कल्स असलेल्या जागी ठेवायचे. हे लक्षात ठेवा की डार्क सर्कल असणारा संपूर्ण भाग झाकलेला असावा. 10 मिनिटांपर्यंत कापूस ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने डोळे धुवून घ्या.
संत्र्याचा ज्यूस
संत्र्याच्या ज्यूसचा डार्क सर्कल्स हटवण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. संत्र्याच्या ज्यूसमध्ये काही थेंब ग्लिसरीन मिसळा. हे मिश्रण डार्क सर्कल्स असलेल्या ठिकाणी लावा. हळूहळू डार्क सर्कल्स नष्ट होतील आणि डोळ्याची नैसर्गिक चमकही वाढू लागेल.
काकडी
तुम्ही टीव्ही किंवा ब्यूटी पार्लरमध्ये लोक डोळ्यांवर काकडीचे स्लाइस ठेवल्याचे पाहिले असेल. काकडीचे स्लाइस केवळ फॅशन म्हणून ठेवले जात नाही. डोळ्यांच्या आरोग्यासाठी काकडी खूप चांगली आहे. यासाठी तुम्हाला काकडी अर्धा तासांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवावी लागेल आणि पुन्हा ते कापून त्याचे स्लाइस डोळ्यावर ठेवावे लागतील. हे स्लाइस 10 मिनिटांपर्यंत डोळ्यांवर राहू द्या आणि पुन्हा डोळे धुवून घ्या. तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल आणि काही दिवसांत डार्क सर्कल्सही कमी होऊ लागतील.
पुदिन्याची पानं
पुदिन्याचा वापर डार्क सर्कल्स हटवण्यासाठी केला जाऊ शकतो. पुदिन्याची काही पाने बारीक करुन त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या जागी लावा. ही पेस्ट रोज रात्री लावा. आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसायला लागेल.
गुलाब जल
त्वचेच्या देखभालीसाठी गुलाब जलला कोणताच पर्याय नाही. गुलाब जल तुम्ही क्लिंजिंग आणि डार्क सर्कल मिटवण्यासाठी वापरु शकतो. कापूस गुलाब जलमध्ये भिजवून डार्क सर्कल असलेल्या भागावर ठेवा. 15 मिनिटं कापूस डोळ्याभोवती ठेवा आणि पुन्हा थंड पाण्याने डोळे धुवून घ्या. एक महिन्यांपर्यंत सातत्याने ही प्रक्रिया केल्यानंतर फरक दिसू लागेल.
ताक आणि हळद
हळद अँटी-बायोटिक असते आणि ती भाज्यांबरोबरच दूधात घालून पिताही येते. त्याचबरोबर जखम झाल्यास त्यावर लावलीही जाते. तर जेवल्यानंतर ताक पिणे चांगले असल्याचे मानले जाते. तुम्ही दोन चमचे ताक घ्या आणि त्यात चमचाभर हळद मिसळा. पुन्हा ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या जागेवर लावा आणि 10 मिनिटांपर्यंत राहू द्या. त्यानंतर गरम पाण्याने डोळे धुवून घ्या.
अनेक लोकांचे डार्क सर्कल हे तात्पुरत्या स्वरुपाचे असतात आणि वाढते वय व अपुऱ्या झोपेमुळे हे उद्भवते. परंतु, डार्क सर्कलच्या समस्येचे अनेक घरगुती आणि डॉक्टरी उपाय असू शकतात. डार्क सर्कल कोणत्याही गंभीर आजाराचा इशारा नसतो. परंतु, हे दीर्घ काळापर्यंत राहिल्यास चिंतेचा विषय अवश्य असतो. याच्यावरील उपचारासाठी डॉक्टरांचा सल्लाही घेतला जाऊ शकतो. ते तुमची मूळ समस्या समजावून घेऊन योग्य उपचार करु शकतात.