(अदभुत / रंजक)
आकाशातून जमिनीवर कोसळणार्या विजांचे लोळ ही फार सामान्य घटना आहे. तसेच सर्व ठिकाणी आणि सतत होणारी ही नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक सेकंदास सुमारे 100 अशा विजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळत असतात. मात्र त्यांची शक्ती मात्र अफाट असते. प्रत्येक विजेच्या लोळात एक अब्ज वोल्ट इतकी विद्युत उर्जा असते. पडणाऱ्या विजेचा प्रचंड वेग आणि तडाखा तसेच त्यात वहन होत असलेली उर्जा एवढी शक्तीशाली असते की तिला उपयोगासाठी साठवणे अजून शक्य झालेले नाही.
एका विजेच्या लोळामध्ये 300 मिलियन म्हणजेच 300 दशलक्ष वोल्ट आणि 30000 अँप्स् ऊर्जा असते. तुलनेने घरगुती वीजप्रवाह 120 वोल्ट आणि 15 अँप इतका असतो. नेहमीच्या 100 वॅट (Watt) क्षमतेचा एक फ्लूरोसेंट बल्ब 3 महीने व तसाच छोटा फ्लूरोसेंट बल्ब जवळपास वर्षभर चालेल इतकी ऊर्जा एका विजेच्या लोळात असते. विजेबद्दल अशीच काही मनोरंजक तथ्य जाणून घेऊया.
- वीज नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षाला वीज पडून 24,000 लोकांचा मृत्यू होत असतो. प्रत्येक सेकंदाला 40 वेळा आकाशामध्ये विजा चमकतात. म्हणजेच एका दिवसात 30 लाख वेळा विजा चमकतात. त्यातील काहीच पृथ्वीवर येतात, तर काही ढगांमध्येच लुप्त होतात.
- आकाशातील एका विजेमध्ये एवढी ताकदअसते की, शंभर वॉट चा एक बल्प तीन महिने चालू शकतो.
- आकाशातील विजेची उष्णता 30000°c असते. सूर्या पेक्षा पाच पटीने जास्त उष्णता या विजेचा झटक्यामध्ये असते.
- आकाशात पडणारी वीज ही चार ते पाच किलोमीटर लांबीची असू शकते. विजेचा प्रकाश एक ते दोन इंच जाडा आणि त्यामध्ये 10 करोड वॉटच्या सोबत 10,000 Amps करंट असतो.
- वीज पडून महिलांपेक्षा पुरुषांची मरण्याची संख्या पाच पटीने जास्त असते.
- 1998 मध्ये आफ्रिकेमधील कांगो या शहरात फुटबॉल मॅच चालू होता. त्यावेळेस अचानक तेथे वीज पडली आणि एकाच टीममधील 11 खेळाडू मृत्युमुखी पडले होते. मात्र दुसऱ्या टीममध्ये असणाऱ्या खेळाडूंना काहीही झालं नव्हतं.
- वीज पडण्याचे जास्तीत जास्त प्रकार हे दुपारचे होतात. ते मानवाचे डोकं, मान आणि खांदे यांच्यावर जास्त प्रभाव पाडते.
- विजेच्या प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त असतो, त्यामुळे प्रथम आपल्याला विजेचा प्रकाश दिसतो आणि नंतर ढगांचा गडगडाट ऐकू येतो. मात्र ढगांचा गडगडाट आणि विजेचा प्रकाश ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी होतात.
- स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वर 300 वेळा वीज पडते, तेही प्रत्येक वर्षाला. जर या वीजा एकत्रित केले तर 600 वॅट वीज जमा होईल.
- आफ्रिकेमधील बोंगो नावाचा प्राणी नेहमी वीज पडून, अर्धवट जळलेली लाकडे खात असतो.
- वीज पडतांना दिसत नाही तर ती जेव्हा खाली पडून वरच्या मार्गाने जाते, तेव्हाच आपल्या दृष्टीस पडते. वीजेचा जो प्रकाश आपल्याला दिसतो, तिची गती 32 करोड फूट प्रति सेकंद असते. ध्वनीची गती 1100 फूट प्रति सेकंद एवढी असते. वीज पडण्याचा आणि गायब होण्याचा कालावधी 2 मायक्रो सेकंद एवढा असतो.
- एकदा जिथे वीज पडली तिथे पुन्हा पडणार नाही असे होत नाही, तर तिथे पुन्हा पुन्हा पडू शकते.
- आवाज न येता वीज पडणं हे शक्य नाही. परंतु तुम्ही आकाशामध्ये वीज चमकली असताना तुम्हाला दिसेल आणि आवाज ऐकला नसेल तर असं समजा की ही वीज तुमच्या पासून खूप दूर पडलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आवाज आलेला नाही. कारण वीज हे शंभर मैल दूर सुद्धा आपल्याला दिसते परंतु आवाज मात्र बारा मैल पर्यंतच ऐकू येतो.
- वीज आकाशात उडणाऱ्या विमानावर सुद्धा पडू शकते, परंतु त्याचा काहीच परिणाम विमानावर होत नाही. 1963 च्या नंतर विमानावर वीज पडण्याची दुर्घटना आजपर्यंत झालेली नाही. कारण विमानाला तशा प्रकारे डिझाईन केले जाते.
- विमान बनवण्यासाठी ॲल्युमिनियम या धातूचा उपयोग केला जातो आणि जेव्हा विमानावर वीज पडते, त्या वेळेस हा धातू विजेला सर्व विमानामध्ये पसरून त्याला आत मध्ये जाऊ न देण्याचे काम करतो. अशा खतरनाक विजेपासून विमानाच्या इंधनाच्या टाकीला देखील संरक्षण दिले जाते.
- वीजा पडण्याचे मुख्य तीन कारणे आहेत. एकाच ढगतील धन व ऋण प्रभारित विभागांदरम्यान इलेकट्रीक डिस्चार्ज होऊन विज चमकते. ही प्रक्रिया ढगांतर्गत असल्यामुळे बरेचदा वीज पडताना न दिसता ढगातून लख्ख प्रकाश पडल्यासारखा दिसतो.
- दोन ढगांमधील विरुद्ध प्रभारित विभागात इलेकट्रीक प्रभारित होऊन हा मार्ग लख्ख प्रकाशाने उजळून निघतो. आपल्याला आकाशात वेडीवाकडी पळणारी वीज दिसते.
- वीज पडणे ढगातील ऋण भरीत कणांमुळे जमिनीवरील वस्तूच्या टोकावर मनोरा, इमारत इ. धनभरीत कण तयार होतात. दोन्ही ठिकाणी यांची संख्या खुप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे एक विद्युत मार्ग तयार होतो आणि वीज पडते.
- जेव्हा दोन्ही दिशांनी येणारे ढग एकमेकांना घर्षण स्वरूपात एकमेकांना भिडतात, त्यावेळेस गडगडाट असा आवाज आपल्याला ऐकू येतो. जेव्हा हे घर्षण होते, त्यावेळेस धन आणि ऋण कण प्रभारित होऊन लख्ख प्रकाश पडतो.
- वीज प्राणघातक असली तरी, आकाशात चमकणारी वीज ही अनेक बाबतीत हिताचीही असते. विजा कडाडणे आपण थांबवू शकत नाही. पण विजा कोसळून होणारी प्राणहानी मात्र योग्य ती सावधानी बाळगल्यास आपण आवश्य थांबवू शकतो.
- पृथ्वीचा पृष्ठभाग हा ऋण प्रभार असतो. तर वातावरण हे धन प्रभारित असते. पृष्ठभागावरून वातावरणा सतत इलेक्ट्रॉन जात असतात. विजा पडल्या नाही तर पृथ्वी आणि वातावरणाचा समतोल बिघडून जाईल.
- आकाशातील वीज ही घरातील वीज प्रवाहित होणाऱ्या विजेपेक्षा कित्येक पटीने जास्त पौवरची असल्याचे दिसून आले आहे. वीज सरळ अंगावर पडू शकते किंवा किंवा ती एखाद्या लांब वर कुठे पडली असल्यास, आपण जिथे उभे आहात तेथे लांब पाईप किंवा लाईटचे तार गेले असल्यास, त्यातून प्रवाह होण्याची शक्यता दाट असते. त्याचा धक्का आपल्याला बसू शकतो.
आकाशात विजा चमकत असताना आपल्याला काही दक्षता घ्यावी लागते
- शेतात काम करत असताना जर विजा चमकत असतील, तर लगेच शेतात बांधलेल्या झोपडीचा किंवा घराचा सहारा घेणे गरजेचे असते.
- शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्यानंतर, पायाखाली कोरडी लाकूड किंवा प्लास्टिक, गोणपाट किंवा कोरडा पालापाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
- पाया व्यतिरिक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. वीजा चमकत असताना शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जाणे गरजेचे असते.
- पावसाळ्याच्या दिवसात पोहणारे, मच्छिमार या लोकांनी विजा चमकत असताना पाण्यातून तात्काळ बाहेर निघून सुरक्षित ठिकाणी जावे.
- विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये. झाडापासून झाडाच्या उंची पेक्षा दुप्पट अंतरावर उभे रहावे.
- शेतातील मोठे झाड किंवा बैठकीचे झाड असेल तर हे झाड विधान पासून सुरक्षित करण्यासाठी त्यावर त्याच्या एका फांदीला तांब्याची तार बांधून जमिनीत खोलवर गाढून ठेवावे.
- एखाद्या उंच इमारती ला विजेपासून धोका असल्यास इमारतीवर किंवा घरावर वीज वाहक यंत्रणा बसवावी.
- जर तुम्ही जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा तुम्ही घ्यायला पाहिजे, जेणेकरुन विजेमुळे काही बरेवाईट घडणार नाही.
- शक्य नसल्यास जमिनीपासून खोलगट भागात गुडघ्यात वाकून बसा. जर आधीच खोलगट भागात असाल तर वर येऊ नका आणि रस्त्याने चार चाकी गाडी जात असाल, तर गाडीच्या बाहेर येऊ नका.