(अदभुत / रंजक)
विश्व सर्वव्यापी आहे. म्हणून जगात दररोज काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्टी घडत असतात किंवा घडलेल्या असतात. जग दिसायला जितके सुंदर दिसते, तितकेच ते रहस्यमय आणि अद्भूतही आहे. आपण याआधी जगातील काही अशाच अद्भूत आणि रहस्यमय गोष्टींबद्दल ऐकले असेल. जगातील अशीच काही मनोरंजक, रहस्यमय तथ्य आपण जाणून घेऊया…
- जगातील सर्वात तिखट मिरची ‘मिर्च ड्रॅगन ब्रेथ चिली पिपर’ आहे. ती एवढी तिखट आहे, कि त्यामुळे माणसाचा जीव जावू शकतो.
- जगातील सर्वात लांब गुफा विएतनामा या देशांमध्ये आहे. ही गुफा एवढी लांब आहे की, त्यामध्ये एक नदी, एक जंगल आणि बराच मोकळा भाग आहे.
- जर आपण बोलताना जास्त वेळा हाताचा उपयोग करत असाल तर तुम्ही प्रतिभाशाली आणि आत्मविश्वासी असल्याचे ते निर्देश आहेत.
- जगात असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी समुद्र आणि वाळवंट एकत्र येतात. आफ्रिकेतील नामिबिया नावाच्या ठिकाणी ही जागा आहे. या ठिकाणी जगातील सर्वात प्राचीन वाळवंट आहे. जे जवळपास 5 दशलक्ष वर्षांहून अधिक जुनं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दिसणारे वाळूचे ढिगारे हे जगातील सर्वात मोठे असल्याचे बोललं जातं.
- आपल्या मेंदूमध्ये चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी जास्त काळ स्मरणात राहतात
- फक्त एक तास जरी तुम्ही हेडफोन चा उपयोग केला तर 700 पेक्षा जास्त बॅक्टेरिया तुमच्या कानामध्ये जमा होतात.
- जगात प्रत्येक सेकंदाला चार मुले जन्माला येतात आणि एका मिनिटाला जवळजवळ 150 मुले तर प्रत्येक तासाला पंधरा हजार मुले आणि एका दिवसाला 3,60,000. इकॉलॉजी ग्लोबल नेटवर्क नुसार, पृथ्वीवर दरवर्षाला 131.4 मिलियन मुले जन्म घेतात.
- हरियाल हा पक्षी महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. हा पक्षी पृथ्वीवर पाय ठेवत नाही. या पक्षांना घनदाट जंगल तसेच उंच उंच झाडे असलेला वनप्रदेश आवडते. बहुतेक पक्षी पिंपळ किंवा वटवृक्ष यावर आपले घरटे बांधणे पसंत करतात. हे सामाजिक पक्षी आहेत आणि ते कळपाने राहतात.
- जगभरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आपल्याला दिसून येते. परंतु ब्राझील हा असा देश आहे, तेथे पिण्याच्या पाण्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत. ब्राझीलमध्ये सर्वाधिक 8,233 घन किलोमीटर नूतनीकरण योग्य पाण्याचे स्त्रोत आहे.
- तुम्ही एक किलो कांदे खरेदी करायला गेले, तर तुम्हाला एका किलोमध्ये पाच ते सहा कांदे येऊ शकतात. परंतु इंग्लंडच्या पीटर ग्रेज ब्रुक यांनी 8 किलोग्रॅम पेक्षा जास्त वजन असलेल्या कांद्याचे उत्पादन करून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’ मध्ये त्यांचे नाव समाविष्ट करून घेतले.
- जेव्हा तुम्ही चंद्राला पाहता, त्यावेळेस चंद्राची फक्त एकच बाजू तुम्हाला दिसते. चंद्राची दुसरी बाजू तुम्हाला कधीच दिसत नाही.
- कोणतेही काम करत असताना स्वतः सोबत बोलले आणि काम चांगल्या रीतीने पार पडू शकते व मन इकडे-तिकडे भटकत नाही.
- मानवी शरीराला झोपण्याची गरज असते जर झोपलाच नाही तर मनुष्य दोन आठवड्यात मरण्याची शक्यता असते.
- 1118 मध्ये एक मोठा भूकंप आल्यामुळे उत्तर अमेरिकेतील मिसिसिपी हि नदी उलट्या दिशेने मध्ये वाहू लागली आहे.
- आकाशातील ढगांना पाहून असं वाटते की, काही कापसाचे हलके-फुलके ढीगारे हवेमध्ये तरंगत आहेत. परंतु हे ढग जमिनीवर का येत नाहीत? एका रिसर्चप्रमाणे अंदाजे त्याचे वजन साडेचार लाख किलोग्राम पेक्षा जास्त असू शकते तरीसुद्धा हे हवेमध्ये वर तरंगत असतात ते खाली पडत नाहीत कारण की ढगा खालच्या वातावरणातील हवा ही ढगापेक्षा खूप भारी असते त्यामुळे हे ढग खाली येऊ शकत नाही.
- चंद्रावर जाणारा पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग यांना माहिती होतं की आपण चंद्रावर जाताना या मोहिमेत त्यांचे प्राण सुद्धा जाऊ शकतात. त्यांच्या कुटुंबांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी त्यांना कोणत्याही कंपनीने इन्शुरन्स दिलेला नव्हता म्हणून त्यांनी या मोहीम मोहिमेवर जाण्याअगोदर 100 पेक्षा जास्त ऑटोग्राफ साइन करून ठेवले होते. या मोहिमेत जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना साईन केलेले ऑटोग्राफ विकून पैसे मिळतील आणि त्यांच्या कुटुंबाला तेवढीच मदत होईल.
- जर तुम्हाला विचारले की जगातील सर्वात जुने हॉटेल किती वर्षांचे असेल, तर तुम्ही उत्तर द्याल 100 किंवा 200 वर्ष परंतु तसे नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, जपान मधील एकैशी माउंटेन्स च्या जवळ ‘निशियामा ओंनसेन’ हे हॉटेल 1300 वर्ष जुने असल्याचा दावा आहे.
-
झुरळ हे सहा पायांचा कीटक आहे. तो एका सेकंदात एक मिटर एवढे अंतर कापू शकतो.
- उत्तर कोरिया मध्ये तुम्ही तुमच्या मनपसंत चैनल टीव्हीवरती पाहू शकत नाही. तेथील सरकार जे चैनल तुम्हाला देतील तेच तुम्हाला पहावे लागते. जर तुम्ही ते पाहण्यास नकार दिला तर तुम्हाला फाशीची सजा सुद्धा होऊ शकते.
- मेघालयातील मावळियानांग या गावात वाहणारी ‘उमंगोट नदी’ ही भारतातील सर्वात स्वच्छ नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी प्रदूषित करणाऱ्यांकडून 5000 रुपयांपर्यंतचा दंड वसूल केला जातो.
- जगातील सर्वात जास्त चॉकलेट खाणारी लोक स्वित्झर्लंडमध्ये आहे. तेथील लोक दरवर्षी दहा किलो चॉकलेट प्रत्येक माणूस खातो.
- जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपल्या शरीरातील 1% पाणी कमी होते, आणि जेव्हा 10% पाण्याची कमतरता होते तेव्हा कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
- हंस हा पक्षी नेहमी जोड्यांनी राहतो. त्यातील एक पक्षी जर मृत पावला तर त्यामध्ये दुसर्याची मरण्याची शक्यता खूप असते.
- शुक्र या ग्रहावरील एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षापेक्षाही जास्त मोठा असतो.
- जगातील सर्वात खतरनाक जहर साइनाइड मानले जाते. परंतु त्याच्या पेक्षाही खतरनाक जहर पोलोनियम आहे. एक ग्रॅम पोलोनियम पाच करोड लोक मारण्याची क्षमता ठेवते.
- मानवांच्या मेंदूला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, जर कधीही आपले डोके दुखत असेल तर ते मेंदूच्या वरचे musscles असतात.
- जगातील अमीर 100 व्यक्ती एका वर्षात एवढी रक्कम कमवतात, की जगातील दारिद्रता चारवेळा नष्ट होऊ शकेल.
- पश्चिम आफ्रिकेतील मातमी जातीचे लोक मृत पावलेल्या व्यक्तींच्या खोपडीचा उपयोग फुटबॉल खेळण्यासाठी करतात.
- ज्यावेळेस आपल्याला शिंक येते त्यावेळेस आपलं हृदय एक सेकंदासाठी स्तब्ध होते.
- सामान्यतः असे मानले जाते की जर तुम्हाला झोप येत असेल तर कॉफी प्यावी, ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. झोप न येण्यासाठी सफरचंद कॉफीपेक्षा जास्त प्रभावी आहे. त्यामुळे जर तुम्हाला रात्री काम करायला आवडत असेल तरच सफरचंद जास्त वापरा.
- एक लहान मूल दिवसातून 300 ते 400 वेळा हसते पण तोच प्रौढ माणूस दिवसातून फक्त 17 वेळाच हसतो कारण लहान मुलाचे मन खूप स्पष्ट असते आणि मोठ्या माणसाचे मन अनेक विचारांनी भरलेले असते.
- एखाद्या व्यक्तीचा मृत्यू भीतीमुळे देखील होऊ शकतो, कारण भीतीमुळे आपल्या शरीरातून मोठ्या प्रमाणात (एड्रेनालाईन) नावाचे रसायन बाहेर पडते, जे जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे आपल्या शरीरात एक प्रकारचे विष म्हणून काम करते.
- कजाकिस्तान या देशातील छोटसं गाव कालची येथील लोकांना चालता-चालता झोप लागून जाते. असं बोलले जाते की, त्या गावातील लोक एका विशिष्ट रोगाने पीडित आहेत, त्यामुळे या गावातील लोक कोठेही आणि केव्हाही झोपून जातात. या गावातील लोकसंख्या 810 आहे त्यापैकी 200 लोक या बिमारीने ग्रस्त आहेत. झोपण्याची बिमारी एकदा लागली की, त्या व्यक्तीला हे सुद्धा माहित नाही की, तो केव्हा उठेल आणि उठले की नाही. जेव्हा वैज्ञानिकांनी तेथे रीसर्च केले तेव्हा असे आढळून आले. तेथे कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोकार्बन याची मात्रा मोठ्या प्रमाणात तेथे आढळून आली. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पाहिजे तेवढा होत नाही. तरीसुद्धा वैज्ञानिक आणि डॉक्टर यांना येथील लोकांना झोपण्याचे खात्रीशीर कारण अजूनही माहित नाही.
- आपल्या जिभेची कोणतीही दुखापत भरून येण्यास जास्त वेळ लागत नाही कारण तुमच्या तोंडात जी लाळ असते ती जखम लवकर बरी करण्याचे काम करते.