(अदभुत / रंजक)
जगात अश्या बरेचश्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचे संपूर्ण जगात एक वेगळे अस्तित्व आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला त्या गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी नेहमी एक उत्सुकता व कुतूहल निर्माण झालेली असते. अशा काही गोष्टीची माहिती जाणून घेऊ…
शहामृगाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात
जगातील सर्वात मोठा पक्षी म्हणून आपल्याला शहामृग आठवतो, आणि जगातून सर्वात मोठे अंडे सुध्दा शहामृगाचे असते, त्याच्या अंड्याची लांबी जवळजवळ १८ सेमी. इतकी असते. शहामृग हा पृथ्वीवरील एकमेव असा प्राणी आहे ज्याचे डोळे हे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात. शहामृगाचे डोळे दोन इंच लांब आणि मोठे असतात आणि ही गोष्ट शहामृगाला बाकी पक्षांपासून वेगळं बनविते.
कासव सर्वात जास्त जगते
माणसाची वयोमर्यादा आपण १०० वर्षही मानली तरीही कासव हा पृथ्वीवर असा प्राणी आहे जो सर्वात जास्त दिवस जगतो. कासव हा २५०-३०० वर्ष जगू शकतो. आणि आपल्या पृथ्वीवर कासवांच्या ३०० प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात.
स्वस्थ माणूस झोपतो वर्षातून चार महिने
एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे की, एक स्वस्थ माणूस एका वर्षाला चार महिने झोपतो. दिवसाला आठ तासांची झोप मानवी शरीराला आवश्यक आहे. माणूस जर पूर्ण एक वर्ष दररोज आठ तास झोपला तर तो एका वर्षात चार महिने झोपेत असतो.
पालीचे हृदय एका मिनिटाला १००० वेळा धडधडत
एका स्वस्थ माणसाचे हृदय एका मिनिटाला ७२ वेळा धडधडत असते. त्याचप्रमाणे एका पालीचे हृदय एका मिनिटाला १००० वेळा धडधडते. ही आपल्याला खूपच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. कारण मानवापेक्षा किती तरी पटीने पालीचे हृदय धडधडत असते.
सरडा एकाच वेळी दोन ठिकाणी पाहू शकतो
माणसाची नजर अशी असते की, एका वेळी तो एकीकडेच पाहू शकतो. पण पृथ्वीवर असा एकच जीव आहे जो एकाच वेळी दोन ठिकाणी पाहू शकतो. तो म्हणजे सरडा आणि सरडा ह्या विशेषतेमुळे बाकी प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तसेच तो परिस्थितीनुसार त्याचा रंग सुध्दा बदलू शकतो.
अन्य काही रोचक तथ्य जाणून घेऊया…
🔸माणसाला 32 दात असतात तर अस्वलाला 42 दात असतात, माकडांमध्ये 36 दात असतात
🔸विंचू सहा दिवसांपर्यंत आपला श्वास रोखून धरू शकतो.
🔸उंदीर बिना पाण्याचा उंटापेक्षाही जास्त काळ राहू शकतो.
🔸वटवाघळाच्या पायाचे हाड हे इतके नाजूक असते की ते चालू ही शकत नाही.
🔸उंटाच्या दुधाचे दही होत नाही.
🔸बेडूक पापण्या बंद न करता कोणतीही गोष्ट मिळवू शकत नाहीत.
🔸एका फुलपाखराचे बाराशे डोळे असतात.
🔸मुंग्यांना फुप्फुसे नसतात आणि त्या कधीही झोपत नाहीत.
🔸आफ्रिकामध्ये असे फुलपाखरू आहे जे आपल्या विषाने एकावेळी सहा मांजरांना मारू शकते.
🔸हरीण गवत खात नाही कारण त्याला गवत खाता येत नाही.
🔸कीटकांना पोट नसते.
🔸खारुताईला लाल रंग दिसत नाही.
🔸पाणगेंडा चा घाम गुलाबी रंगाचा असतो
🔸स्टार फिश या माशाला आठ डोळे असतात.
🔸गोरिला एका दिवसात 80 किलो पेक्षा जास्त अन्न पचवू शकतो.
🔸हमिंगबर्ड हा एक असा पक्षी आहे जो पाठीमागच्या बाजूला सुद्धा उडू शकतो.
🔸समुद्रात मिळणाऱ्या खेकड्याचे हृदय हे त्याच्या डोक्यामध्ये असते.
🔸एक वयस्क हत्ती त्याच्या सोंडेमध्ये हे पाच ते आठ लिटर एवढे पाणी ठेऊ शकतो.
🔸घोडा उभे राहता राहता झोपू शकतो.
🔸एक वयस्कर वाघ 35 ते 40 फूट लांब उडी मारू शकतो.
🔸हत्ती हा असा प्राणी आहे जो कधीच उडी मारू शकत नाही
🔸इसवी सन 17 पर्यंत भारत हा एक श्रीमंत देश होता.
🔸अमेरिका आणि जपान नंतर सुपर कम्प्युटर बनवणारा भारत हा तिसरा देश आहे.
🔸जगातील सर्वात जास्त शाकाहारी लोक भारतामध्ये आहेत.
🔸भारताने आत्तापर्यंत कधीच कोणत्या देशावर प्रथम हल्ला केला नाही.
🔸भारत सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे.
🔸माणूस एका वर्षात जवळपास पन्नास लाख वेळा श्वास घेतो.
🔸जन्माच्या वेळी मानवी शरीरात 300 हाडे असतात व कालांतराने ती 209 होतात.
🔸मानवी शरीरातील एक चतुर्थांश हाडे ही पायामध्ये असतात.
🔸डोळे उघडे ठेवून शिंकणे हे जवळपास अशक्य आहे.
🔸प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे छाप वेगवेगळे असतात त्याचप्रमाणे जिभेचे छाप हे देखील वेगवेगळे असतात.
🔸जर तुम्ही 111,111,111 X 111,111,111 याचा गुणाकार केला तर त्याचे उत्तर तुम्हाला 12,345,678,987,654,321 असे मिळेल.
🔸कुत्र्यांमध्ये रक्ताचे प्रकार हे 13 आहेत हेच माणसांमध्ये चार आहेत.
🔸चीनमध्ये दररोज जवळपास 30 हजार पेक्षा जास्त कुत्र्यांना मांस आणि कातडीसाठी मारले जाते.
🔸महिला दररोज सरासरी २०,००० शब्द बोलतात, जे पुरुषांच्या सरासरीपेक्षा 13000 शब्द जास्त आहेत.
🔸बुद्ध ग्रहावर १ दिवस हा २ वर्षाइतका असतो.
🔸ऑक्टोपसला ३ हृदय असतात.
🔸हाताच्या बोटाच्या नखे ही पायांच्या बोटांच्या नखापेक्षा 4 पट अधिक वेगाने वाढतात.
🔸सरासरी प्रत्येक व्यक्ती २०-२५ वर्षे झोपेत घालवते.
(वरील मजेदार आणि रोचक तथ्ये असलेली पोस्ट आपल्या मित्रमंडळीना अवश्य शेअर करा )