एक प्रमुख ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीने ‘प्युअर व्हेज मोड’ आणि ‘प्युअर व्हेज फ्लीट’ चे अनावरण केले आहे. खवय्यांचे आवडते पदार्थ घरपोच आणून देण्यासाठी २४x७ कार्यरत असलेली Zomato ही फूड डिलिव्हरी सेवा नेहमीच अद्ययावत राहत अधिक चांगली सेवा देण्यास तत्पर असते. आपल्या देशात शाकाहारी लोकांची संख्या खूप मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून मांसाहार सोडून शाकाहाराकडे वळणारा वर्गही वाढत आहे. ही संधी लक्षात घेऊन अशा शाकाहारी ग्राहकांसाठी फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोने मोठा निर्णय घेतला आहे.
जे ग्राहक शाकाहारी आहेत त्यांना केवळ शाकाहारी हॉटेल्स किंवा उपहारगृहातून खाद्यपदार्थ मागवणे सोपे जाईल. देशभरातील शाकाहारी ग्राहकांच्या मागणीस प्रतिसाद देत कंपनीने हे पाऊल टाकले आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर ही माहिती दिली. तसेच, त्यांनी ग्राहकांची मागणी आणि विविध आहारातील प्राधान्ये पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेवर जोर दिला.
दीपंदर गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकाहारी ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात, झोमॅटोने ‘प्युअर व्हेज मोड’ सादर केले आहे. जे केवळ शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्सची निवड करते. भारतामध्ये शाकाहारी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या मागण्या विचारात घेऊन सेवा देणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही ही महत्त्वाची प्रणाली सुरु केल्याचे ते म्हणाले.
गोयल यांनी विशिष्ट ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झोमॅटोच्या भविष्यातील योजनांची रूपरेषा सांगितली. यातील एक भाग म्हणजे ग्राहकांना खाद्यपदार्थ पोहोचवताना वाहतुकीदरम्यान त्यांची गळती होणे, पदार्थांना हाणी पोहोचण या बाबी टाळण्यावर भर दिला जाणार आहे. उदा. केकची वाहतूक हानी न होता सुरक्षित आणि सुनिश्चित करण्यासाठी हायड्रॉलिक बॅलन्सरने सुसज्ज समर्पित केक वितरण लॉन्च केले जाणार आहे. झोमॅटोची नवकल्पना आणि ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्धता दर्शविणारा ही विशेष केक वितरण प्रणाली येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे.
झोमॅटो ही एक ऑनलाईन ऑर्डर स्वीकारुन ग्राहकांना खाद्यपदर्थ पूरवणारी कंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण भारतातील प्रमुख शहरांमध्ये सेवा देते. त्यासोबतच जगभरातील इतरही काही देशांमध्ये कंपनीने अलिकडे आपले जाळे निर्माण केले आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1