(गुहागर )
शाळा…! खरं तर प्रत्येक मानवसृष्टीला सकारात्मक दिव्य दृष्टी बहाल करणारं मुक्त विद्यापीठ शाळा. अज्ञानातून ज्ञानाकडे, असत्यातुन सत्याकडे घेऊन जाणारी तेजोमय अशी पायवाट आहे. विकसनशील म्हणविल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतुन अथक त्यागातून, परिश्रमातुन आणि समर्पणातुन तयार झालेलं संविधान भारतात २६ जानेवारी १९५० रोजी लागू झालं आणि खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यात, वाडी वस्त्यांवर, दुदूरवरच्या पारावर पशुसमान वागवल्या जाणाऱ्या माणसांना माणसांत आणण्याची प्रक्रिया याच शाळा नावाच्या वर्गातून सुरू झाली. कधी मोडक्यातोडक्या, तर कधी पावसाळ्यात छप्पर गळक्या एखाद्या इमारतीत शाळा भरू लागली, कधी जमिनीवर तर कधी गोणपाटावर बसून अ आ इ ई… शिकण्यात पिढ्यानपिढ्या जगण्याच्या मार्ग शोधू लागले. अगदी त्यातुनच कित्येकाना जगण्याचे नवे मार्ग सापडले. आपल्यातील कित्येकांना स्वतःच्या पायावर उभे करत समाजात ताट मानेन जगायला लावणारी आपली ज्ञानमयी शाळा आज 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षात दमदारपणे पाऊल टाकतेय.
गुहागर तालुक्यातील नामांकित असलेला कर्दे गावं . या गावातील 50 वर्षापूर्वी येद्रे वाडीतील वाड वडिलांनी भावी पिढीचा विचार करता, आपले मुले शिक्षणा पासून वंचित राहता कामा नये म्हणून शिक्षण क्रांती ची ज्योत प्रज्वलित करून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कर्दे नंबर २ ची निर्मिती केली. त्या निर्मितीला अनेक हात एकत्र येऊन शाळा निर्मितीचे स्वप्न साकार केले. ही शाळा आज ५० वे वर्षात पदापर्ण करत आहे.
संध्याकाळी महिलांचा हळदी कुंकू सभारंभ नियोजित वेळेत पार पडला. तसेच आलेल्या प्रमुख पाहुणे यांचा मान सन्मान करून व विद्यार्थी वर्गाचा गुण गौरव करण्यात आला. रात्री लहान मुलाचे डान्स ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर आजी-माजी विद्यार्थी प्रस्तुत शाळेय जीवनावर आधारित मराठी नाटकं “गगन भरारी” कथा वाड – वडिलांच्या संघर्षांची गाथा 50 व्या वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाची दाखवण्यात आली. या नाटकाचे लेखक/ दिग्दर्शक कृष्णा शांताराम येद्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला रसिक राजाचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला. या नाटकाचे संगीतकार संदेश आंबेकर , प्रकाश योजना अविनाश मांजरेकर तसेच कलाकार आनंद सनगरे , रमेश शिरगावकर , प्रसाद दळवी, नायिका सुनैना कोंडविलकर, नायिका मनाली करण, अंकिता येद्रे , तन्वी येद्रे, तन्वी दीपक येद्रे, साहिल सनगरे,चेतन राजाध्यक्ष , विनोद बारस्कर, साहिल येद्रे , सुनिल रांगळे असे अनेक कलाकार या नाटकाचे सहभागी होते.
संपूर्ण कार्यक्रम अगदी आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. गावातील अनेक लोकांनी तिथे दिवस रात्र कष्ट सहन करून हा भव्य दिव्य असा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला.