(रत्नागिरी)
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने दिनांक 21 ते 23 जुलै 2024 रोजी चंद्रपूर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा सहभाग होता. सदर संघात जिल्हा संघटनेला अधिकृत मान्यता असलेली तालुक्यातील युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप ओम साई मित्र मंडळ येथे सुरु असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील स्वरा हर्षल तेरवणकर, निलाक्षी राजेश राहटे, वेदांत संतोष देसाई, नूपूर निलेश दप्तरदार, योगराज सत्यविजय पावर यांना सुवर्ण तर नुपूर निलेश दप्तरदार, उपर्जना राम कररा, रुद्धी मधुर धुळप, भार्गवी सत्यविजय पवार, अर्णव हेमराज निर्मल, योगराज सत्यविजय पवार, वेदांत संतोष देसाई, योगराज एस. पवार, भार्गवी सत्यविजय पवार यांना कास्य पदके मिळाली.
या खेळाडूंनी राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत पूमसे प्रकारात प्रथम क्रमांक व साघिक जनरल तिसरा क्रमांकाची ट्रॅफि रत्नागिरी जिल्हायानी पटकावली. वरील सर्व यशस्वी खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष श्री वेंकटेश्वर राव कररा ( जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार विजेते) उपाध्यक्ष श्री शैलेश गायकवाड ( पी आय )श्री.विश्वदास लोखंडे सचिव श्री लक्ष्मण कररा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी संजय सुर्वे व सर्व पदाधिकारी तसेच कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालय चे अध्यक्ष अनंतजी आगाशे युवा मार्शल टायकोंडो ट्रेनिंग सेंटर चे सर्व पदाधिकारी पालक, प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.
विजेते सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा महिला प्रशिक्षिका सौ शशी रेखा कररा सहप्रशिक्षक प्रतीक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सदर जिल्हा संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून युवा अकॅडमी चे प्रशिक्षक अमित जाधव, महिला प्रशिक्षिका सौ शशी रेखा कररा यांनी काम पहिले यशस्वी सर्व खेळाडू व प्रशिक्षक याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.