(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड व गणपतीपुळे परिसरात बुधवारी रंगपंचमीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मालगुंड व गणपतीपुळे परिसरातील बालगोपाळांसह अनेक तरुण-तरुणींनी एकमेकांवर रंगांची उधळण करत रंगपंचमी सणाचा आनंद लुटला. मालगुंड व गणपतीपुळे परिसरात वाड्यावाड्यातून बाळ गोपाळ व तरुणाई रंगपंचमी साजरी करण्यासाठी एकवटली होती.
यावेळी मोठ्या प्रमाणात लहान मुलांसह तरुणाईने रस्त्यावर उतरून तर काहींनी ढोल ताशांच्या गजरात आपापल्या वाड्यांमधून वाजत गाजत एकमेकांवर रंगांची उधळण करून रंगपंचमीचा आनंद लुटला. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लहान थोराला रंगऊन रंगपंचमीचा उत्साह प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात द्विगुणित केल्याचे चित्र दिसून आले.
मालगुंडबरोबरच गणपतीपुळे परिसरात ही चौका चौकात आणि विशेषत: समुद्र चौपाटीवरील स्थानिक व्यवसायिकांनी रंगपंचमीचा आनंद लुटल्याचे चित्र दिसून आले.