(चिपळूण / प्रतिनिधी)
जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब सावर्डे यांच्यातर्फे सह्याद्री आर्ट्स व सायन्स महाविद्यालय,सावर्डे येथे व्यक्तिमत्व विकास व करियर मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथपाल दिनानिमित्ताने भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर यांनी सांगितले की विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत.त्यांची योग्य पद्धतीने जडणघडण होण्यासाठी त्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. महविद्यालयाचे प्राचार्य तानाजी कांबळे यांनी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाची गरज स्पष्ट केली.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा.मिलिंद कडवईकर यांनी करिअर निवडताना घ्यायची काळजी, ध्येयिश्चिती,वेळेचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकासात निर्माण होणारे अडथळे व त्यावर कशाप्रकारे मात करता येईल यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचा महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रम प्रसंगी ला.राजेश कोकाटे, ला.गिरीश कोकाटे, ला.विजय राजेशिर्के, सतीश वारे, प्रा.चौरे, ला.डॉ.वर्षा खानविलकर, प्रा.जावीर, प्रा.शेंबेकर, ग्रंथपाल सुषमा काजरोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबच्या सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.देवराज गरगटे यांनी केले.