(चिपळूण)
स्टेट इनोवेशन अँड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र (सर फाउंडेशन) राष्ट्रस्तरीय “शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2023″चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाचे तंत्रस्नेही शिक्षक श्री.योगेश चंद्रकांत नाचणकर यांनी सादर केलेल्या “स्वमत मांडा लेखक व्हा!”या नवोपक्रमाची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांचा यात समावेश आहे. सर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ, हेमा वाघ, सिद्धाराम मशाळे जिल्हा समन्वयक विनय राणे आयटी प्रमुख राजकिरण चव्हाण यांनी माहिती दिली. पुरस्काराचे वितरण मार्चमध्ये विशेष एज्युकेशनल इनोव्हेशन कॉन्फरन्स मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात शिक्षण तज्ञाचे व्याख्याने, उपक्रमाचे सादरीकरण, परिसंवाद, कार्यशाळा, गटचर्चा असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
नाचणकर यांच्या या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, आमदार श्री. शेखरजी निकम,संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब भुवड, संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक, संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर आदींनी अभिनंदन केले आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1