कोरोना काळात जगभरात स्मार्टफोन विक्रीचा बाजार मोठ्या प्रमाणात वाढला. सर्वकाही ऑनलाईन सुरु असल्याने अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला स्मार्टफोन गरजेचा झाला. यामुळे अगदी कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनला बाजारात मागणी वाढली. यामुळे २०२१ या चालू वर्षात सर्वात कमी किंंमतीत स्मार्टफोन विकणाऱ्या Xiaomi कंपनीने Apple कंपनीलाही मागे टाकले आहे. यामुळे जगात अव्वल क्रमांकाची स्मार्टफोन कंपनी बनण्यासाठी आता अमेरिकेची जगप्रसिद्ध Apple कंपनी आणि चीनची Xiaomi यांच्यात स्पर्धा सुरू आहे २०२१ च्या दुसर्या तिमाहीत Xiaomi कंपनी जगातील दुसर्या क्रमांकाची स्मार्टफोन सेलिंग कंपनी बनली आहे. Canalys अहवालानुसार, २०२०-२१ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये १७ टक्के बाजार भागीदारीसह श्याओमी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्मार्टफोन ब्रँड ठरला आहे.
Apple चा ग्रोथ रेट सर्वात कमी
तर १९ टक्क्यांसह सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र Apple कंपनीला १४ बाजार भागीदारीसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. मात्र BBK ओन्ड कंपनीच्या मालकीच्या Oppo आणि Vivo ने पहिल्या टॉप ५ मध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या बाजारात Oppo ची १०-१० टक्के बाजार भागीदारी आहे. तरीही Xiaomi कंपनीचं बाजारात सर्वाधित टॉपवर आहे. Xiaomi चा ग्रोथ रेट सध्या ८३ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यापाठोपाठ Oppo ने २८ टक्के आणि Vivo ने २७ टक्क्यांवर मजल मारली आहे. यापोठापाठ सॅमसंगचा ग्रोथ रेट १५ टक्के झाला आहे. यानंतर सर्वात कमी म्हणजे १ टक्के ग्रोथ रेट Apple चा झाला आहे.
स्वस्त किंमतीमुळेच Xiaomi ची सर्वाधिक विक्री
Canalys चे रिसर्च मॅनेजर Ben Stanton सांगतात की, Xiaomi कंपनीने परदेशातील बाजारपेठेत खूप वेगवान प्रगती केली आहे. पश्चिम युरोप, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत Xiaomi च्या स्मार्टफोनला सर्वाधिक पसंती आहे. सर्वात स्वस्त किंमतीमुळेच आज Xiaomi चे स्मार्टफोन सर्वांच्या पसंतीस उतरत आहेत. विशेष म्हणजे Xiaomi च्या स्मार्टफोनची किंमत Samsung पेक्षा ४० टक्क्यांहून तर Apple च्या तुलनेत ७५ टक्के कमी आहे. यामुळे Xiaomi प्रीमियम स्मार्टफोन मार्केट शेअर वेगाने वाढतायंत. याचा फायदे आगामी तिमाहीत दिसून येईलचं. Xiaomi ने Mi 11 Ultra हा स्मार्टफोन नुकताचं बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन कंपनीचा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे.
ही कारवाई Xiaomi साठी ठरली फायदेशीर
Canaly अहवालानुसार, मागील तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. सन २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन कंपन्यांचा सर्वाधिक ग्रोथ रेट Huawei कंपनीमुळे वाढला आहे. यामुळे २०१९ वर्षात Huawei ने जागतिक बाजारपेठ Apple कंपनीला मागे टाकले. परंतु त्यानंतर Huawei ला जागतिक बाजारपेठेतील बंदीचा सामना करावा लागला आहे. आणि याचा सर्वाधिक फायदा Xiaomi कंपनीला झाला.