भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने आज पहाटे (गुरुवार, 8 ऑगस्ट) कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या भारताला बुधवारी मोठा धक्का बसला. फायनलपर्यंत धडक मारलेली व सुवर्ण पदकाची आशा जागवणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हीच वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला ऑलिम्पिक मधून बाद करण्यात आलं. विनेश फोगटने 2016, 2020 आणि 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु तिला एकदाही पदक जिंकता आले नाही. पॅरिसमध्ये अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिचे रौप्य पदक निश्चित झाले होते, परंतु वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यानंतर आता तिने निवृत्तीची घोषणा केली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलपूर्वी 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवले होते, त्यानंतर आता विनेशने हा निर्णय घेतला. यासह तिचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्नही अधुरे राहिले आहे.पॅरिसमध्ये अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिचे रौप्य पदक निश्चित झाले होते, परंतु वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. तिचे प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र तिला स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आलं होतं.
विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात लढत होती. ६ ऑगस्ट रोजी, त्याने जागतिक क्रमवारीत-१ आणि गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील चॅम्पियन युई सासाकीसह तीन कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी १०० ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, विनेश फोगटने ऑलिम्पिकच्या निर्णयाविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये तक्रार केली आहे. विनेश फोगटला आता रौप्यपदक मिळणार की नाही याबाबत सीएएस आज ( 8 ऑगस्ट) अंतरिम निर्णय देणार आहे.
विनेश फोगाटने भावनिक होऊन तिच्या आईचा उल्लेख करत लिहिले की, ‘आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व संपल आहे, आता माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व.