(रत्नागिरी)
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत केंद्र शासन नवीन कायदा अंमलबजावणी अनुषंगाने रविवारी, (दिनांक ९ फेब्रुवारी २०२५) श्री सिद्धगिरी मंगल कार्यालय हॉल हातखंबा येथे तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली आहे. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सन २०२३ नव्याने अस्तित्वात आलेल्या खालील, भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्ष कायदा २०२३ याबाबत माहिती दिली. तसेच परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी पाटील यांच्यासह अमित वायकुळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी, पांडूरंग नंदिवाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी तसेच पोलीस निरीक्षक रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणेचे राजेंद्र यादव, यांनी कायदा सुव्यवस्था, महिला अत्याचार, पोक्सो कायदा अनुषंगाने मार्गदर्शन केले आहे. या कार्यक्रमास हातखंबा ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी संघटना पदाधिकारी, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.