(रत्नागिरी)
कोकण रेल्वे मार्गावर गर्दीचा हंगाम नसतानाही मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-सावंतवाडी वातानुकूलित स्पेशल जाहीर केल्याने प्रवासी अचंबित झाले आहेत. सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी वातानुकूलित स्पेशल २२ जून रोजी धावणार आहे. या स्पेशलचे आरक्षणही खुले झाले आहे.
०११७१/०११७२ क्रमांकाची सीएसएमटी मुंबई- सावंतवाडी वातानुकूलित स्पेशल २२ जून रोजी रात्री १२.२० ला सीएसएमटी स्थानकातून सुटेल. त्याचदिवशी दुपारी २.२० ला सावंतवाडी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात शनिवारी दुपारी ३.१० वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ ला सीएसएमटी येथे येथे पोहचेल. ही स्पेशल दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आदी स्थानकांत थांबणार आहे.
गर्दीची तीव्रता कमी करण्याचे कारण देत मध्य रेल्वे प्रशासनाने भर पावसात अचानक सीएसएमटी मुंबई सावंतवाडी वातानुकूलित स्पेशल जाहीर करत प्रवाशांना सुखद धक्का दिला असला तरी कोणतेही नियोजन अथवा मागणी नसताना देखील वातानुकूलित स्पेशल सोडण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्नही प्रवासी संघटनेसह प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.