(रत्नागिरी)
विद्यार्थ्यांना आणण्यासाठी रत्नागिरीत येणाऱ्या रिक्षावर शहराजवळील शिरगाव – दत्त मंदिर येथे झाडाची मोठी फांदी पडली. यामध्ये रिक्षाचालक जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शाहअजीम महम्मद हुसैन पटेल ( ५२ , रा . साखरतर , रत्नागिरी ) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास शिरगाव दत्तमंदिर, रेशनदुकान रस्त्यावर घडली. जखमी शाहअजीम पटेल हे आपल्या ताब्यातील रिक्षा ( एमएच- ०८ – ई -८८८५) घेऊन शाळेतून सुटणाऱ्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी साखरतरहून रत्नागिरीकडे येत होते. शिरगाव – दत्तमंदिर येथे आले असता अचानक सुटलेल्या वाऱ्याने झाडाची मोठी फांदी तुटून त्यांच्या रिक्षावर पडली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.