(मालवण)
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जनसंपर्क यात्रेत आमदार भास्कर जाधव यांच्या नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेत खरी शिवसेना ही आमच्या महायुतीमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली “उभाटा” म्हणजे काय याचे योग्य वेळी उत्तर देईन. राष्ट्रवादीत असताना बाळासाहेब ठाकरेयांच्या एकसंघ शिवसेनाबाबत आदित्य ठाकरें बाबत केलेले वक्तव्य आणि भास्कर जाधव यांच्याबाबत कणकवली येथील टिकेवर येत्या 16 फेब्रुवारी रोजी गुहागर येथे जाहीर सभा घेऊन खरपूस समाचार घेणार असल्याचे माजी खासदार निलेश राणे यांनी ओरोस येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथील विश्रामगृहावर माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर आदी उपस्थित
होत. नीलेश राणे म्हणाले, भास्कर जाधव यांना पक्षाचा अभिमान किती आणि काय आहे हे आपल्याला माहित आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शरद पवार यांच्यासमोर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर त्यांच्या नातवावर आदित्यवर केलेली टीका ही रेकॉर्ड केलेली आहे त्याची ध्वनी प्रक्षेपण करून दाखवत आज ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये शिवसेना नेते म्हणून मिरवत आहेत. कणकवली येथील जाहीर सभेत माझ्या वडिलांबाबतकेलेली टीका आपल्याला सहन होण्यासारखी असून या टीकेला आपण येत्या १६ फेब्रुवारी रोजी आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात योग्य तो समाचार घेईन असेही निलेश राणे म्हणाले.
राजकीय संन्यास घेणार का ?
बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर बोलणारे भास्कर जाधव आज शिवसेनेचे नेते म्हणून मिरवत आहेत. शिवसेनेबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल कधी बोललो तर राजकीय संन्यास घेईल असे बोलणारे भास्कर जाधव यांच्याबाबत प्रक्षेपित केलेली ध्वनिफीत ऐकून त्यांच्या कुटुंबावर केलेली ही टीका ऐकून आता राजकीय संन्यास घेणार का असा सवाल करत, उद्याच्या 16 फेब्रुवारी रोजी याबाबत योग्य ते प्रत्युत्तर गुहागर येथेच देईन असेही त्यांनी स्पष्ट केले